नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , श्रीवर्धन आगाराची श्रीवर्धन लातूर बस चालकाची अल्कोहोल टेस्ट झाल्यावर तीन तासा नंतर बस प्रवासासाठी रवाना – आजचा महाराष्ट्र

श्रीवर्धन आगाराची श्रीवर्धन लातूर बस चालकाची अल्कोहोल टेस्ट झाल्यावर तीन तासा नंतर बस प्रवासासाठी रवाना

श्रीवर्धन प्रतिनिधि /रामचंद्र घोडमोडे

प्रवाशांचा मात्र तीन तास खोळंबा. बस बंद करण्यासाठी छडयंत्र तर नाही ना ?

रायगड (श्रीवर्धन) :- श्रीवर्धन आगारातून पहाटे ५ वाजता लातूरकडे रवाना होणारी श्रीवर्धन लातूर बस सेवा अल्पावधीत श्रीवर्धन आगाराला उत्पन्न देण्यात अग्रेसर ठरली आहे. या बसला प्रवाशांचाही चांगला प्रतिसाद मिळत असून दिनांक ३१/८/२०२३ रोजी प्रवाशांना वेगळ्याच अनुभवाला सामोरे जावे लागले. पहाटे ६.३० वाजता लातूर बस स्थानकातून सुटल्या नंतर टेंभुर्णी बस स्थानकात

आल्या नंतर बस चालक दारू प्यायल्याचे कारण सांगून चालकाची अल्कोहोल टेस्ट करण्यात आली. व बस साठी नवीन वाहन चालक देण्यात येईल असे सांगण्यात आले. यावेळी प्रवाशांनी वाहन चालकाची बाजू घेत बस लातूर वरून सुटल्यानंतर वाहन चालक बस सोडून कुठेही न गेल्याचे तसेच बस चालवताना कोणतेही घाई किंवा बेजबाबदार पणा करताना न जाणवल्याचे सांगितले. यावेळी चालकाची मशीनद्वारे टेस्ट करण्यात आली त्यावेळेस १२ टक्के. ८ टक्के अल्कोहोल असल्याचे प्रवाशांना सांगण्यात आले.यावेळेस बस स्थानकातून इतर ठिकाणी जाणाऱ्या बस चालकांची टेस्ट करण्यात अधिकाऱ्यांना कोणताही रस नव्हता. याच दरम्यान प्रवाशांनी दुसऱ्या बस चालकांची सुद्धा टेस्ट करण्यास सांगितले त्यावेळी दुसऱ्या वाहन चालकांची टेस्ट ८ ते १५ टक्क्यांच्या दरम्यान आली. हे सर्व घडत असताना प्रवाशांना नाहक ३ तास त्रास सहन करावा लागला. बस टेंभुर्णी स्थानकात थांबवण्यात आली असल्याने. बस श्रीवर्धन मध्ये उशिरा पोहोचल्या नंतर बागमांडला तसेच श्रीवर्धन परिसरातील इतर ठिकाणी जाणाऱ्या प्रवाशांना नाहक त्रास करावा लागला आहे.करण्यात आलेल्या कारवाईमध्ये प्रवाशांना अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. अल्कोहोल टेस्ट करत असताना वाहन चालकाच्या रक्तामध्ये किती टक्के अल्कोहोल असणे आवश्यक आहे. एवढे अल्कोहोल चालकाच्या रक्तामध्ये होते का ? नसेल तर ३ तास टेंभुर्णी स्थानकात गाडी थांबवण्याचे कारण काय ? अल्कोहोलचे प्रमाण जर होते तर तोच वाहन चालक पुढील प्रवासासाठी पाठवून प्रवाशांच्या जीवाशी खेळ का बरं करण्यात आला ? यामध्ये वाहन चालकाचा वैयक्तिक वाद अधिकाऱ्यांशी तर नाही ना ? श्रीवर्धन लातूर बस बंद करण्यासाठी छडयंत्र रचले तर जात नाही ना ? अल्कोहोल टेस्टिंग मध्ये बस चालक दोषी आढळल्या नंतर श्रीवर्धन बस स्थानकात याबाबत कळवण्यात आले होते का ? तसा पत्र व्यवहार करण्यात आला आहे का ? या सर्व गोष्टींबाबत रायगड विभाग सखोल चौकशी करणार का ? यामध्ये खाजगी वाहन चालक म्हणून काम करणाऱ्या वाहन चालक तसेच प्रवाशांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागले आहे.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]