नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , पनवेल मध्ये राष्ट्रवादी व मनसेला धक्का! – आजचा महाराष्ट्र

पनवेल मध्ये राष्ट्रवादी व मनसेला धक्का!

मुंबई प्रतिनिधि /महेश कदम 

मुंबई :- महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या कार्यशैलीने प्रभावित होऊन पनवेलचे महानगर प्रमुख मा.नगरसेवक ॲड. प्रथमेश चंद्रशेखर सोमण यांच्या नेतृत्वात पनवेल शहरातील राष्ट्रवादीचे माजी शहराध्यक्ष महेश सावंत तथा महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेचे पनवेल शहराध्यक्ष सिद्धेश खानविलकर यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष राहिलेले महेश सावंत यांनी यापूर्वी निवडणूक लढवून भरघोस मते घेतली आहेत. तर अनेक वर्ष मनसेशी संलग्न असलेले सिद्धेश खानविलकर यांनी देखील आता शिवसेनेत सक्रिय काम करण्याचा निर्णय घेतला आहे. या दोघांनीही मुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत वर्षा निवासस्थान येथे जाहीर पक्षप्रवेश केला व त्यानंतर पनवेलमध्ये महानगरप्रमुख प्रथमेश सोमण व आज रोजी खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांचीही पनवेल मध्ये भेट घेतली. यावेळेस खासदार बारणे यांनीही त्यांचे शिवसेनेत स्वागत केले.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]