नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , तुमसरातील महिला सहकारी बँकेत १० लाखांची चोरी– – आजचा महाराष्ट्र

तुमसरातील महिला सहकारी बँकेत १० लाखांची चोरी–

प्रतिनीधी संजीव भांबोरे

भंडारा :- अज्ञात दोन चोरट्यानी शहरातील गुरुनानक नगर येथील सिंधुताई महिला नागरी पतसंस्था सहकारी बँकेच्या शटरचे कुलूप व कँश रुमचे ड्रॉप तोडुन बँकेमध्ये आत प्रवेश करुन तिजोरीतील १० लक्ष ३३ हजार तीनशे अठ्ठावन्न रुपयांची रोख रक्कम लंपास केली.ही घटना बुधवार ता.३० ऑगस्ट ला रात्री ८.१५ ते ९.४५ च्या

सुमारास घडली.चोरी गेलेल्या मालात ५०० चे १४८३ नोटा एकुण ७४१५००,२००रु. चे ८१० नोटा एकुण १६२०००रु.१०० रु. चे १००८ नोटा एकुण १८०० रु. ५० रु. चे २४९ नोटा एकुण १२४५० रु. २० रु. चे ५०७ नोटा एकुण १०१४०रु. १० रु. च्या ३९६ नोटा एकुण ३९६० रु. चिल्लर नाणी २५०८ रु. असे एकूण नगदी १०,३३,३५८ रुपये रोख रक्कम अज्ञात चोरट्यानी चोरून नेल्याचे दिसून आले.याप्रकरणी बँकेचे व्यवस्थापक चेतन चिंधालोरे यांनी तुमसर पोलिसात फिर्याद दिली या फिर्यादी वरून तुमसर पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध अपराध क्र.४६२/२०२३ कलम ४५७,३८०,३४ भांदवी नुसार गुन्हा नोंद केला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक निलेश ब्राम्हणे करीत आहेत.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]