क्रीडा दिनाचे औचित्य साधून मा. नितीन पाटील नगरसेवक पनवेल मनपा यांच्या वाढदिवसा निमित्त ग्रा.प.सदस्य सुजित पाटील यांनी शाळेला विविध क्रीडा साहित्य दिले भेट.

रा.जी. प. शाळा कसारभट येथे क्रीडा दिन साजरा.
रायगड ( खारपाडा ) :- पनवेल तालुक्यातील रा.जी.प. शाळा कसारभट येथील शाळेत मुख्याध्यपक् धस सर यांच्या मार्गदर्शना खाली क्रीडा दिन मोठ्या उत्साहत साजरा करण्यात आळा. शाळेचे मुख्याद्यापक धस सर यांनी मुलांना मेजर ध्यानचंद यांच्या जीवनाविषयी माहिती व खेळाचे महत्व समजावून सांगितले.

तसेच ग्रुप ग्रा. प. साई सदस्य श्री सुजित पाटील यांनी क्रीडा दिनाचे औचित्य साधून मा. नितीन पाटील नगर सेवक पनवेल मनपा यांच्या वाद दिवसा निमित्त मराठी शाळेतील मुलांना मोफत विविध् प्रकरचे खेळाचे साहित्य व खाऊ वाटप करण्यात आला. खेळाच्या साहित्या मध्ये कॅरम, चेस,( बुद्धिबल ),लागोरी , ,लेझीम,सापसीडी,बॅडमिंटन ,फूड बोल, राबरी रिंग, थ्रो रिंग,दोरी उडया, कमरेत फिरणारी मोठी रिंग इ. क्रीडा वस्तू भेट देण्यात आल्या. शाळेत भेट आलेल्या क्रीडा वस्तू पाहुन् विद्यार्थ्यांचा आनंद गगनात मावे ना आशी परिस्थिती झाली.मुलानं मध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले.

या कार्यक्रमासाठी ग्रुप ग्रामपंचायत साई, सदस्य श्री सुजित पाटील ,शाळा व्यवस्थापन समेती ,आध्यक्ष भालचंद्र भोंडकर ,दीपाली ताई, सुरेश ठाकूर,संभाजी पाटील,कैलास पाटील, अनिता ठाकूर आदी उपस्तित होते.
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space













