चिंचवली खोंड्याची वाडी येथे कोलाड विभाग काँग्रेस कमिटी तर्फे स्वच्छता अभियान
प्रतिनीधी कोलाड
रायगड (रोहा – कोलाड) :- कोलाड विभाग काँग्रेस कमिटी तर्फे काँग्रेस कमिटी अध्यक्ष हरिओमभाऊ टाळकुटे यांच्या संकल्पनेने चिंचवली खोंड्याची वाडी येथे ग्रामस्वच्छता अभियान राबवले गेले. यावेळी खोंड्याची वाडी ग्रामस्थांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला .किल्ला गाव कमिटीचे अध्यक्ष मंगेश जाधव ,उपाध्यक्ष दिनेश जाधव ,नितीन कोळी, नितिन पवार, तसेच खोंड्याची वाडी काँग्रेस कमिटी अध्यक्ष 
समिर पवार,उपाध्यक्ष महादेव पवार ,सेक्रेटरी विनायक कोळी आदी कार्यकर्ते व गावातील ज्येष्ठ नागरीक सखाराम काका कोळी तसेच इतर ग्रामस्थ उपस्थित होते . सदर कार्यक्रम झाल्यानंतर ग्रामस्थांच्या विविध प्रश्नांबाबत चर्चा ग्रामस्थांनी हरिओमभाऊ टाळकुटे यांच्याशी केली .काँग्रेस पक्षाच्या माध्यमातुन विविध प्रश्नांची सोडवणुक निश्चित होईल असे अध्यक्ष हरिओम भाऊ टाळकुटे यांनी सांगितले. यावेळी बोलताना हरिओमभाऊ म्हणाले की संत गाडगे बाबांच्या 
विचारांचा अंगिकार करुन आपण ही स्वच्छता मोहिम राबवली त्यासाठी बहुसंख्य ग्रामस्थांनी अभियानात उस्फुर्त सहभाग घेतला त्याबद्दल आभार व्यक्त केले .तसेच ही मोहिम राबवत असताना आपण सामाजिक जाणिवेतुन काम करत असल्यामुळे व आपला पक्ष जरी राजकीय असला तरी आपण ९० टक्के समाजकारण व १० टक्के राजकारण करणार असल्याचे सांगितले .आणि म्हणुनच आज आपण पक्षाचा बॅनर वा झेंडा वापरला नसल्याचे सांगितले.
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space













