नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त खेड तालुका धनगर समाजाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाला आज दापोली मतदार संघाचे लोकप्रिय आमदार श्री. योगेश दादा कदम साहेब उपस्थित राहिले. – आजचा महाराष्ट्र

पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त खेड तालुका धनगर समाजाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाला आज दापोली मतदार संघाचे लोकप्रिय आमदार श्री. योगेश दादा कदम साहेब उपस्थित राहिले.

पत्रकार राजेंद्र दळवी

रत्नागिरी (खेड) :- या कार्यक्रमामध्ये गुणवंत विद्यार्थी व त्यांच्या पालकांचा तसेच माजी सैनिकांचा सन्मान माझ्या हस्ते करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या आणि माजी सैनिकांनी दिलेल्या योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. तसेच उपस्थित सर्वांशी संवाद साधला.

धनगर समाज हा नेहमी श्री. रामदासभाई कदम यांच्या पाठीशी ठामपणे उभा राहिला आहे. सन १९८९ पासून आजतागायत धनगर समाजाने आम्हाला पाठबळ दिले आहे. या समाजाच्या वाड्या या गावापासून ४-५ किलोमीटरच्या अंतरावर डोंगरात वसलेल्या असतात. त्यामुळे या वाड्यांवर भौतिक सुविधा पोहोचवणे खूप कठीण काम असते. परंतु हे कठीण काम साध्य करण्यासाठी वेळोवेळी शासन दरबारी पाठपुरावा करत यासाठी लागणारा भरीव निधी उपलब्ध करून घेतला आणि आज सर्वच वाड्यांवर लाईट, रस्ते यासारख्या सुविधा झाल्या आहेत. सध्या या वाड्या वस्त्यांवरील लोकांसाठी पाण्याची स्वतंत्र योजना देखील सुरू करण्यासाठी मी प्रयत्न करत असून लवकरच या योजनांची कामे प्रत्यक्षात सुरू होतील असा शब्द सर्व समाज बांधवांना दिला. तसेच धनगर समाजाच्या विकासासाठी कोणत्याही प्रकारचा निधी कमी पडू देणार नाही असे आश्वासन देखील दिले.

याप्रसंगी जिल्हाप्रमुख श्री. शशिकांत चव्हाण, तालुकाप्रमुख श्री. सचिन धाडवे, माजी सभापती श्री. रामचंद्र आईनकर, श्री. युवराज गुजर यांच्यासह शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]