गोरेगाव येथे जगदंबा मित्र मंडळा कडून नागपंचमी सणाचे आयोजन

रायगड (माणगाव) :- माणगाव तालुक्यातील गोरेगाव या ठिकाणी जगदंबा मित्र मंडळातर्फे श्रावणातील पहिला सण नागपंचमी साजरा केला मंडळाचे हे ३३ वे वर्ष असून सकाळी नेमाने गणेश कला केंद्रातुन श्री नागदेवतेची आकर्षक अशी मूर्ती ढोलताशा च्या गजरात संत रोहिदास नगर येथे आणून तेथे मूर्तीची विधिवत पूजा करण्यात आली सकाळ पासूनच भाविकांनी नागदेवतेचे पूजन करण्यासाठी व दर्शनासाठी गर्दी केली होती गोरेगाव पोलीस स्टेशन चे ए. पी. आय नावले साहेब व त्यांचे पोलीस सहकारी यांनी सुद्धा मंडळाला सदिच्छा भेट दिली व नागदेवतेचे दर्शन घेतले तसेच ग्रामपंचायतचे 
सदस्य चंद्रकांत गोरेगावकर व त्यांचे कुटुंब यांनी दर्शन घेतले येणाऱ्या सर्व मान्यवरांचे मंडळा कडून येथोचित स्वागत करण्यात येत होते. संध्याकाळी नागदेवतेचे वाजत गाजत विसर्जन मिरवणूक काढण्यात आली यावेळी जगदंबा मित्र मंडळाचे युवराज मुंडे, देवेंद्र वाठोरे,दिनेश हरवंडकर, निलेश वाठोरे, मयेंद्र वायडे,सचिन खाडे, अविनाश गोरेगावकर, स्वप्नील खाडे, जयेंद्र मुंडे, विजय गुडेकर,नितीन मुंडे शिवसेना शहर प्रमुख सचिन शिगवन व जगदंबा मित्र मंडळाचे सर्व सहकारी यावेळी उपस्थित होते गोरेगावं च्या विष्णू तलावात गोरेगावं गोपाळ समाजाच्या बांधवानी नागदेवतेचे विसर्जन केले
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space













