रोह्यातील श्रीराम लॉज विरोधात ग्रामस्थ आक्रमक, लॉजचा परवाना रद्द करावा अशी ग्रामस्थांची मागणी करत, रोहा पोलिसांना दमखाडी ग्रामस्थांनी दिले निवेदन

लॉज कोणत्या उद्देशाने चालविण्यास दिला? ग्रामस्थांचा सवाल
रायगड (रोहा) :- रोहा शहरातील मध्यवर्ती ठिकाण असलेल्या दमखाडी नाक्यावरील श्रीराम लॉजवर वेश्याव्यवसाय चालत होता.या वेश्याव्यवसायावर रोहा पोलिसांनी शुक्रवारी मध्यरात्री धाड टाकुन कारवाई केली…

मध्यवर्ती ठिकाणी वेश्याव्यवसाय होत असल्याने श्रीराम लॉज च्या विरोधात दमखाडी ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत…या लॉजची चौकशी करण्यात यावी… भरवस्तीत असलेल्या लॉजचा परवाना रद्द करण्यात यावा अशी मागणी करीत तीव्र निषेध नोंदवला आहे….रविवार दि. २० ऑगस्ट रोजी दमखाडी ग्रामस्थ आक्रमक होत ११.३० वाजण्याच्या सुमारास नाक्यावर श्रीराम लॉजच्या विरोधात निदर्शने केली…. यावेळी ग्रामस्थांनी घोषणा दिल्या…. त्यानंतर महिला मंडळ व ग्रामस्थांच्यावतीने पोलिस निरीक्षक प्रमोद बाबर यांना निवेदन देण्यात आले…

यावेळी माजी उपनगराध्यक्ष महेश कोलटकर, काशिनाथ धाटावकर, समाधान शिंदे, मनोहर धाटावकर, भूपेंद्र धाटावकर, विलास पालवणकर, अशोक धाटावकर, अशोक माने, गणेश बारणेकर, सुर्यकांत कोलाटकर, गिरीश घोसाळकर,सुधीर घोसाळकर, पांडुरंग धाटावकर आदी उपस्थित होते.
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space













