धक्कादायक!अल्पवयीन मुलीवर लैगिंक अत्याचार; पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल

रायगड (तळा) :- तळा तालुक्यात एका अल्पवयीन मुलीवर लैगिंक अत्याचार घडल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.तळा पोलिस सूत्रांनी माहिती दिल्या नुसार आरोपी याने पीडित मुलगी अल्पवयीन असल्याचे माहिती असताना देखील तिला लग्नाचे आमिष दाखवून तिला तळा येथून मुरुड येथील कोणत्या तरी लॉज वर नेऊन तिच्या सोबत तिच्या संमती शिवाय जबरदस्तीने तिच्या अज्ञानपणाचा फायदा घेऊन वेळोवेळी जबरदस्ती करत होता व तिची 
मोठी बहीण हिला शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली म्हणून दि.१८ ऑगस्ट रोजी रात्री २०.४५ वा.गुन्हा रजिस्टर नंबर ७८/२०२३ भादवि कलम ३७६,३७६(२)(जे)(एन) ३५४(ड) ३२३,५०४,५०६ तसेच बालकांच्या लैगिंक अत्याचारापासून संरक्षण अधिनियम कलम ४,८,१२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तळा तालुक्यातील आरोपी साजिद कुरुक्कर वय वर्षे २५ रा.तळा बाजारपेठ मच्छी मार्केटच्या मागे याने लग्नाचे आमिष दाखवून वासने पोटी भानंग तालुका तळा येथील एका अल्पवयीन मुलीवर तिच्या संमती शिवाय जबरदस्तीने तिच्या अज्ञानपणाचा फायदा घेऊन वेळोवेळी जबरदस्ती केली ही घटना माहे एप्रिल २०२१ पासून ते आज पर्यंत सुरूच असताना फिर्यदीची मोठी बहीण हिला शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना घडल्याचे तळा बाजारपेठेत समजल्या नंतर येथे तळेवासियांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती.सर्वांनी पोलिस ठाणे गाठून या आरोपी विरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी केली या घटनेची माहिती मिळताच माणगाव उपविभागीय पोलिस अधिकारी मिलिंद पोंदफुले यांनी घटना स्थळी भेट दिली व घटनेचे गांभीर्य समजून सर्वांना शांततेचे आवाहन केले आहे.या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून आरोपी विरोधात संतापाची लाट उसळली आहे तळा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून आरोपी साजिद कुरुक्कार याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून उपविभागीय पोलिस अधिकारी मिलिंद पोंदफुले यांच्या मार्गदर्शनाखाली तळा पोलिस निरीक्षक कैलास डोंगरे पुढील तपास करत आहेत.
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space













