तळा नगरपंचायत प्रभाग क्रमांक ४ मधील मुस्लीम युवकांचा शिवसेनेत प्रवेश; शिंदे गटाला मोठा हादरा

रायगड (तळा) :- तळा तालुक्यात शिंदे गटाला मोठा हादरा बसला असून अनेक मुस्लिम युवक, महिला मंडळ आणि ग्रामस्थ यांनी नझीर पठाण यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शिवसेना(उ बा.ठाकरे) गटात जाहीर प्रवेश केला आहे.यावेळी जिल्हा प्रमुख अनिल नवगणे 
तालूका अध्यक्ष नाना दळवी महीला संघटक लताताई मुंढे,बोरीवली शिवसेना विभाग प्रमुख सुधीर सोनावणे यांच्या प्रमुख उपस्थितीत जाहीर प्रवेश केला.नजीर पठाण हे कट्टर शिवसैनिक म्हणून ओळखले जातात.त्यांनी यापुर्वी या प्रभागातून शिवसेना पुरस्कृत उमेदवार निवडून आणण्यास मदत केली आहे.राष्ट्रवादीचा हा प्रभाग 
म्हणून ओळखला जात होता गेल्या दहा वर्षांतील सेना पुरस्कुत उमेदवार आहेत.शिंदे गटातील काही कार्यकर्ते विचारात न घेता डावलून कामे करीत असल्याची खदखद वाढू लागली असल्यामुळे आज शिवसेना शिंदे गटाला राम-राम करीत उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश करून पक्षाची ताकद वाढलीआहे. या पुढचा उमेदवार हा आमच्या पक्षाचाच असून नगरसेवक करणार अशी ग्वाही यावेळी प्रवेश कर्त्यानी दिली.
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space













