नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , खेड तालुक्यातील जि. प.आदर्श प्राथ. शाळा,दिवाणखवटी गणपती शाळेत स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा – आजचा महाराष्ट्र

खेड तालुक्यातील जि. प.आदर्श प्राथ. शाळा,दिवाणखवटी गणपती शाळेत स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा

पत्रकार राजेंद्र दळवी

रत्नागिरी(खेड):- स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त शाळेत दि.१३/०८/२०२३, दि.१४/०८/२०२३ व दि.१५/०८/२०२३ रोजी ध्वजारोहण करण्यात आले. दि.१३/०८/२०२३ रोजी ग्रामपंचायत दिवाणखवटी मार्फत शालेय परिसरात शहिद जवान अनाजी येशू मोरे यांच्या नावाने शिलाफलकाची उभारणी करण्यात आली व सदर शिलाफलकाचे अनावरण त्यांच्या पत्नी श्रीम.इंदू अनाजी मोरे यांच्या हस्ते करण्यात आले. वसुधा वंदन अंतर्गत शालेय परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी गावातील स्वातंत्र्यसैनिक ,निवृत्त वीरांचा (शाल,श्रीफळ,बुके )सन्मान करण्यात आला. उपस्थित सर्वांना हातात दिवे देत पंचप्राण शपथ देण्यातआली.दि.१५/०८/२०२३ रोजी शाळेत विद्यार्थी गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात आला.

रत्नागिरी जिल्हा परिषद शिक्षण विभागाने राबविलेल्या रत्नागिरी टॅलेंट सर्च या परिक्षेत संस्कार सतिश जन्मले इ.४थी केंद्रस्तर व प्रभागत प्रथम,आमचा रत्नागिरीचा भास्कराचार्य या परिक्षेत संस्कार सतिश जन्मले इ.४थी केंद्रात प्रथम तर सम्यक मनोज तांबे इ.३री केंद्रस्तर प्रथम व प्रभागात दुसरा क्रमांक याप्रकारे शाळेतील विद्यार्थ्यांनी दैदिप्यमान यश मिळविले त्या विद्यार्थ्यांचा व शाळेतील मार्गदर्शक शिक्षक श्री.विनोद शंकर लष्कर व श्रीम.संगीता हनमंतराव भुसे या शिक्षकांचा यावेळी गुणगौरव करण्यात आला.या प्रसंगी उपस्थित श्री. अमित कदम (Army सोल्जर) यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देतांना स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केले.तसेच

गावातील सरपंच आदरणीय रुपाली साळवी मॅडम, उपसरपंच आदरणीय गीता शिंदे मॅडम,ग्रामपंचायत सदस्य आदरणीय मंगेश सागवेकर सर,ग्रामसेविका आदरणीय मर्चंडे मॅडम,तलाठी आदरणीय शिंदे मॅडम यांनी विद्यार्थ्यांना बहुमोल मार्गदर्शन करत भावी शिक्षणाकरिता शुभेच्छा दिल्या.सदर कार्यक्रमासाठी शा.व्य.स.अध्यक्षा आदरणीय अश्विनी मोरे व इतर सदस्य, ग्रामपंचायत दिवाणखवटी येथील सदस्य, गावातील मान्यवर मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते .सदर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन शाळेचे मुख्याध्यापक श्री.विनोद शंकर लष्कर यांनी केले.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]