माजी मुख्यमंत्री कै. वसंतराव नाईक यांची पुण्यतिथी निमित्त कुडे येथे शेतकरी मेळावा

रायगड (तळा) :- स्वर्गीय वसंतराव नाईक यांच्या पुण्यतिथी निमित्त १८ ते २४ ऑगस्ट या कालावधीत कृषी योजना मेळावा सप्ताह आयोजित करण्यात येणार आहे. त्यानुसार संपूर्ण जिल्ह्यामध्ये कृषी योजना मेळावे आयोजित करण्यात येत आहेत,त्यानुसार मौजे कुडे येथे शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते यावेळी कृषी विभागाच्या विविध योजनाबाबत सविस्तर माहिती देण्यात आली अर्ज करण्याची प्रक्रिया, त्याकरीता आवश्यक दस्तऐवज, अनुदानाचे स्वरूप व अनुषांगिक बाबी, संबंधित कार्यक्षेत्रामध्ये लागवड होणाऱ्या प्रमुख पिकांचे लागवड तंत्रज्ञान, पिकांच्या महत्त्वपूर्ण वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या कीड व रोग व त्यांचे नियंत्रण याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या सुरवातीला हरित क्रांतीचे प्रणेते माजी मुख्यमंत्री कै. वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेस माजी सरपंच तानाजी कालप यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले या नंतर कृषी सहाय्यक गोविंद पाशीमे यांनी कार्यक्रमचे प्रास्ताविक केले व कृषी विभागाच्या योजना मग्ररोहयो फळबाग लागवड,प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया, पीएमकीसन,शेततळे, ठिबक सिचन,कृषी यांत्रिकीकरण अश्या योजनांची माहिती दिली.या नंतर मंडळ कृषी अधिकारी सचिन जाधव यांनी भात पीक उत्पादन वाढीसाठी नवीन तंत्रज्ञान, कृषी क्षेत्रात
यांत्रिकीरणाचा वापर तसेच फळबाग लागवडी पासून काढणी पर्यंतचे नियोजन या विषयी माहिती सांगितली कार्यक्रमच्या शेवटी सरपंच मांदाड तानाजी कालप यांनी शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या योजना घेण्यासाठी पुढे आले पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केली या कार्यक्रमास मांदाड ग्रामपंचायत माजी सरपंच तानाजी कालप,मंडळ कृषी अधिकारी सचिन जाधव,कृषी सहाय्यक गोविंद पाशीमे ,गाव अध्यक्ष,शेतकरी ,महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space













