मानवी हक्क संरक्षण फेडरेशन तर्फे स्वातंत्र्य दिन साजरा
वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांचा सत्कार
रायगड (पनवेल) :- मानवी हक्क संरक्षण फेडरेशन तर्फे स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधत पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांचा शाल व मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. त्यावेळी अनेक विषयांवर चर्चा करण्यात आली.

पोलीस कर्मचाऱ्यांना पुष्पगुच्छ व गुलाबाचे फुल देऊन स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.त्यावेळी पोलीस निरीक्षक अंजुम बागवान व इतर पोलीस अधिकारी यांच्यासह मानवी हक्क संरक्षण फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.मुनीर तांबोळी, राष्ट्रीय कार्याध्यक्ष श्रेयस ठाकूर, जनसंपर्क अधिकारी पंकज शहा,महिला मुंबई सचिव कविता हेगडे, रायगड जिल्हा महिला अध्यक्ष स्नेहल होवाल, पनवेल तालुका महिला अध्यक्ष रत्नमाला पाबरेकर, कामोठे शहर महिला अध्यक्ष किरण अढागळे व इतर सदस्य पदाधिकारी उपस्थित होते.
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space













