नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , प्राथमिक शिक्षक समितीतर्फे खेडमध्ये विद्यार्थी गुणगौरव व शिक्षक सन्मान सोहळा – आजचा महाराष्ट्र

प्राथमिक शिक्षक समितीतर्फे खेडमध्ये विद्यार्थी गुणगौरव व शिक्षक सन्मान सोहळा

पत्रकार राजेंद्र दळवी

रत्नागिरी (खेड) :- महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती तालुका शाखा -खेड आयोजित प्राथमिक शिक्षकांचे गुणवंत पाल्य व शिक्षक सन्मान सोहळा रविवार दिनांक १३ ऑगस्ट २०२३ रोजी श्री.गणेश मंगल कार्यालय काळकाई मंदिर शेजारी भरणे येथे तालुका अध्यक्ष श्री शरद भोसले यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. या गुणगौरव सोहळ्याच्या औचित्य साधून शिक्षक समिती,शाखा-खेड, लायन्स क्लब,खेड व रॉयल हॉस्पिटल,भरणे यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत

मेगा हेल्थ चेकअप मेडिकल कँप याचे आयोजन करण्यात आले होते . या कॅम्प मध्ये १०४ शिक्षक, पालकांनी फ्री चेकअपचा लाभ घेतला. तसेच या समारंभ सोहळ्यात उपस्थित राज्य कार्यकारणी राज्य कार्यकारणी सदस्य श्री अंकुश गोफणे, शिक्षक नेते श्री दिलीप महाडिक, जिल्हा सचिव श्री सुनील दळवी, जिल्हा कार्याध्यक्ष श्री रुपेश जाधव, जिल्हा कोषाध्यक्ष श्री संतोष पावणे, शिक्षक पतपेढी चेअरमन श्री विलास जाधव, तज्ञ संचालक श्री. संजय सुर्वे यांचे सह खेड तालुक्यातून प्रथमच गुणवंत अधिकारी म्हणून महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार प्राप्त झालेले शिक्षण विस्तार अधिकारी श्री संतोषजी भोसले व दापोली तालुक्यातील पालघर प्रभागाचे शिक्षण विस्तार अधिकारी श्री सुनीलजी सावंत यांचीही विशेष उपस्थिती होती. तसेच अखिल महाराष्ट्र संघ खेड तालुका अध्यक्ष श्री.सु.रा. पवार उर्दू शिक्षक संघटना अध्यक्ष श्री.अखलाक परकार, केंद्रप्रमुख श्री. विनायक नलावडे, श्री. अंकुश उंडे यांचे सह अन्य मान्यवर उपस्थित होते.

   

 या सोहळ्यात जिल्हा परिषद शाळा मधून गुणवत्ता यादीत आलेल्या पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेतील विद्यार्थी व नवोदय विद्यालय निवड झालेले, नासा इस्रो साठी निवड झालेले विद्यार्थी यांचा विशेष सन्मान करण्यात आला.तसेच प्राथमिक शिक्षकांचे एम.टी.एस. बी.डी.एस. आय.टी.एस, होमी भाभा सारख्या बाह्य स्पर्धा परीक्षा,५ वी ८ वी शिष्यवृत्ती परीक्षा, इयत्ता १०वी, १२वी उत्तीर्ण,JEE NEET, CET या उच्च शिक्षण प्रवेश परीक्षा उत्तीर्ण व इंजिनीयर, डॉक्टर व अन्य तसंम् डिग्री डिप्लोमा कोर्स पूर्ण केलेल्या, क्रीडा क्षेत्रात विशेष नाही पुण्य मिळवलेल्या प्राथमिक शिक्षकांच्या पाल्यांचा सन्मान करण्यात आला. तसेच सेवानिवृत्त, विविध संस्थांचे गुणवंत आदर्श पुरस्कार मिळालेले शिक्षक विशेष कामगिरी केलेले शिक्षक असे मिळून ११८ विद्यार्थी व ६४ शिक्षकांचा सन्मान करण्यात आला.     

       खेड तालुक्यात प्रथमच गुणवंत अधिकारी म्हणून महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळाल्याबद्दल विस्तार अधिकारी श्री.संतोषजी भोसले यांचा विशेष सन्मान करण्यात आला. जि.प. आदर्श शाळा, आदर्श शिक्षक यांचा सन्मान करण्यात आला. 

  यावेळी जिल्हा सचिव श्री. सुनील दळवी यांनी प्रास्ताविकासह संघटनात्मक चळवळीचा आढावा घेतला, तर शिक्षक समिती जिल्हा नेते श्री दिलीप महाडिक यांनी प्रशासकीय कारभाराच्या नियोजनाचा अभाव आणि यामुळे शिक्षकांवर, विद्यार्थी गुणवत्ते होणाऱ्या परिणामाच्या थांबवण्यासाठी संघटनात्मक चळवळीची गरज व दिशा याबद्दल आपल्या परखड शैलीत विचार व्यक्त केले.     

       खेड तालुक्यातील शिक्षक संघटनांचे काम समन्वयच्या माध्यमातून अतिशय चांगल्या प्रकारे सुरू असलेबद्दल व सर्व संघटना पदाधिकारी या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याबद्दल सर्व मान्यवरांनी खेड तालुक्यातील शिक्षक संघटनेच्या एकजुटीचे विशेष कौतुक केले. संघटनांनी एकीने लढण्याचा आदर्श खेड तालुक्याकडून आपण सर्वांनी घेऊ या असा प्रवाह मान्यवरांच्या विचारातून व्यक्त झाला. यावेळी आपल्या अध्यक्षीय भाषणात बोलताना शिक्षक समितीचे खेड तालुकाध्यक्ष शरद भोसले यांनी खेड शिक्षक समिती तालुक्यात राबवत असलेल्या विविध उपक्रमाबद्दल माहिती दिली संघटनेतील कोणत्याही सभासदावर जर अन्याय होत असेल तर संघटना तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे शिक्षक समितीचा जो झंजावात तालुक्यामध्ये निर्माण झाला आहे याचे खरे श्रेय तालुक्यातील प्रत्येक सभासदाला आहे असे सांगत तालुक्यातील प्रत्येक सभासदाने घेतलेल्या मेहनतीमुळेच आजचा हा कार्यक्रम एवढा भव्यदिव्य झाला असे आवर्जून सांगितले या कार्यक्रमासाठी खेड तालुका सहसचिव श्री.धर्मपाल तांबे, उपाध्यक्ष श्री बबन साळवी, श्री.अनिल यादव ,कार्याध्यक्ष श्री शरद शिंदे, कोषाध्यक्ष श्री नरेश ठोंबरे, माजी जिल्हा पदाधिकारी श्री अजित भोसले, श्री परशुराम पेवेकर श्री संजय गडाळे कार्यालयीन चिटणीस श्री. अर्जुन गावित, संघटना प्रवक्ते श्री.नेत्रदीप तांबे, प्रसिद्धी प्रमुख श्री शैलेश पराडकर ,श्री दिलीप यादव संघटना ऑडिटर श्री बबन मोरे,यांचेसह श्री.अनिल मोरे, संतोष मोरेश्री.रघुनाथ महाडिक, श्री.अमर चव्हाण, श्री.संतोष चव्हाण, श्री नवनीत घडशी, श्री.श्रीकृष्ण खांडेकर, श्री नारायण शिरकर, अनंत मोरे श्री भागोजी कडव, श्री. चंद्रकांत पवार, श्री.भिकू जानकर, कृष्णा पवार श्री. संतोष बर्वे, श्री. दिलीप देसाई, श्री.तुकाराम काताळे, श्री.दिलीप कडू, श्री.सुभाष महाडिक , श्री.महेंद्र पाटील, श्री.येडू केकान, श्री. गजानन पालांडे, भारत घुटुकडे ज्ञानोबा सोमवंशी दिनेश पवार सचिन गावडे प्रमोद कदम संतोष तांबट महिला प्रतिनिधी सौ. स्वाती यादव, सौ.दीक्षिता तांबे, सौ.सुविधा सावंत, सौ.तृप्ती काताळे, सौ.पूनम दळवी, सौ. दीप्ती यादव, श्रीम.कल्याणी कासार, श्रीम.सुजाता चाळके, सौ.नम्रता चाळके, सौ.नेहा सुर्वे, सौ नेहा देवरुखकर, सौ.रसिका खांडेकर, सौ.रत्नप्रभा शिंदे, किरण जानकर श्रीम.स्नेहल यादव, सौ. शर्वरी भोसले यांचेसह पालक विद्यार्थी व अन्य शिक्षक उपस्थित होते.      

       कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री दिपक कांबळे यांनी तर आभार प्रदर्शन श्री.शैलेश पराडकर यांनी केले.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]