रायगड जिल्हा परिषद शाळा कासारभट येथे स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा..

रायगड ( पेन खारपाडा) :- पनवेल तालुक्यातील मौजे कासर् भट गावातील मराठी शाळेत ७६ वा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला .हा स्वातंत्र्य दिन शाळेतील विद्यार्थी ,शिक्षक ,मान्यवर आणि गावातील ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला . ७६ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त, आझादी के अमृत महोत्सव के दिनी 
सकाळी गावातून प्रभात फेरी काढण्यात आली. तद्नंतर श्री. हरिभाऊ शिवराम् पाटील यांच्या हस्ते ध्वज पूजन करून ध्वजारोहन् दिन साजरा करण्यात आला .धजारोहन् झाल्या नंतर विद्यार्थी व मान्यवरची भाषणे झाली.या नंतर शाळेतील डिजिटल क्लासरूम चे उदघाटन श्री मनीष हेमंत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले .या कार्यक्रमा निमित्त ” माणुसकीची साथ मदतीचा हाथ” या
संकल्पनेतून माझी विदयार्थी व ग्रामस्थ यांनी मराठी शाळेच्या विकासा साठी व विद्यार्थ्याच्या शिक्षणिक विकासा साठी भरभरून आर्थिक व वस्तू स्वरूपात मदत करण्यात आली..त्यात कोणी शालेला रंग रागोटी केली तर कोणी शालेय उपयोगी वस्तू दिल्या. त्या मध्ये स्मार्ट टीव्ही, सी.सी. कॅमेरे, ट्यूब लाईट,फिल्टर,फॅन, कपाट ,टेबल इ.या कार्यक्रमासाठी मुख्याध्यापक श्री धस सर, विद्यार्थि ,शालेय व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य, माता पालक,अंगणवाडी सेविका सौ.सुमन पाटील, सौ. जयश्री भोंडकर ,पत्रकार सुरेश तांडेल. श्री. परशुराम पाटील, श्री. दामोदर पाटील, श्री. हरिभाऊ पाटील, श्री. महेश पाटील, श्री. गुरुदास तांडेल, श्री. रुपेश भोंडकर, श्री. मंगेश भोंडकर,श्री. शशी भोंडकर, श्री. विश्वास म्हात्रे, श्री. नामदेव तांडेल, श्री. राकेश भोंडकर आणि समस्त गावकरी उपस्थित होते….
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space













