नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , न्यू इंग्लिश स्कूल व श्री पी के दरेकर जुनिअर कॉलेजच्या माजी विद्यार्थी विद्यार्थिनी यांनी प्रवेशद्वार नवीन मेन गेट व शालेयबोर्ड गुरुदक्षिणा म्हणून शाळेला भेट दिली(सन २००८-२०१२बॅच ) – आजचा महाराष्ट्र

न्यू इंग्लिश स्कूल व श्री पी के दरेकर जुनिअर कॉलेजच्या माजी विद्यार्थी विद्यार्थिनी यांनी प्रवेशद्वार नवीन मेन गेट व शालेयबोर्ड गुरुदक्षिणा म्हणून शाळेला भेट दिली(सन २००८-२०१२बॅच )

पत्रकार राजेंद्र दळवी

रत्नागिरी (खेड) :- भारतीय स्वातंत्र्य दिनाचा ७६ वा वर्धापन दिनानिमित्त प्रशाळेच्या सन २००८ ते सन २०१२ मधील माजी विद्यार्थी विद्यार्थिनी प्रशाळेच्या विविध भौतिक गरजा लक्षात घेऊन व शाळेविषयी, शाळेतील वंदनीय गूरू, शिक्षकेतर कर्मचारी, संस्थेविषयी असणारी कृतज्ञता, दातृत्वाची भावना निर्माण करून सन २००८ ते २०१२ मधील माजी विद्यार्थी आणि विद्यार्थिनी आदर्श ठेवावा अशी एक अनमोल गुरुदक्षिणा भेट-

शाळेचे दर्शनी गेट व बोर्ड देऊन शाळेची भौतिक गरज पूर्ण केली. इतर सर्व माजी विद्यार्थ्यांना एक आदर्श प्रेरणा निर्माण करून दिली. त्याबद्दल संस्थेचे सन्माननीय अध्यक्ष श्री भालचंद्र बेलोसे उपाध्यक्ष श्री दिलीप राणे, सेक्रेटरी मा. श्री चंद्रकांत दळवी

सहसेक्रेटरी सौ. माधवी दळवी, खजिनदार श्री.वैभव दरेकर सर्व संस्था संचालक संस्था सदस्य शाळेचे मुख्याध्यापक श्री विजयकुमार माळी ज्येष्ठ शिक्षिका सौ नवले मॅडम,सौ कोदारे मॅडम , सर्व शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी, पालक वर्ग, ग्रामस्थ यांनी आनंद व अभिनंदन , धन्यवाद व्यक्त केले

शाळेचे माजी विद्यार्थी विद्यार्थिनी सन २००८ ते २०१२ बॅचमधील सर्व विद्यार्थी -विद्यार्थिनी यांनी इतर सर्व विद्यार्थ्यांना एक आदर्श निर्माण करून दिला .शाळेच्या विविध भौतिक गरजा पूर्ण करण्यासाठी या माजी विद्यार्थ्यांनी एकत्रित येऊन एक सामाजिक बांधिलकी, शाळेविषयी आपुलकी जिव्हाळा ,आत्मीयता कृतज्ञता व्यक्त करून एक समाजापुढे आदर्श निर्माण केला . या माजी विद्यार्थिनी शाळेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली सर्व विद्यार्थ्यांना त्यांनी खाऊचे वाटप केले संस्थेच्या वतीने व प्रशाळेच्या वतीने माजी विद्यार्थ्यांचा योग्य सन्मान करण्यात आला.सर्व माजी विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक धन्यवाद .

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]