न्यू इंग्लिश स्कूल व श्री पि .के दरेकर जुनियर कॉलेज आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेजमध्ये भारतीय स्वातंत्र्य दिनाचा ७६ वा वर्धापन दिन विद्यार्थी गुणगौरव कार्यक्रम उत्साहात संपन्न

रत्नागिरी (खेड) :- खवटी पंचक्रोशी शिक्षण संस्था खवटी संचलित न्यू इंग्लिश स्कूल व श्री पी के दरेकर जुनियर कॉलेज खवटी शाळेमध्ये भारतीय स्वातंत्र्य दिनाचा ७६ वा वर्धापन दिन संस्थेचे उपाध्यक्ष मा. श्री दिलीप राणे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात 
आले यावेळी प्रशाळेतील विद्यार्थ्यांनी संचलन करून ध्वजाला मानवंदना दिली.त्यानंतर प्रशाळेचे माजी विद्यार्थी विद्यार्थ्यांनी ( सन २००८ ते २०१२ बॅच )नवीन प्रवेशद्वार मेन गेट शालेय बोर्ड उद्घाटन सोहळा संपन्न झाला संस्थेचे अध्यक्ष व सर्व संचालक मंडळ ग्रामस्थ

पालक प्रशाळेचे मुख्याध्यापक व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी आनंद अभिनंदन व धन्यवाद व्यक्त केला .त्यानंतर SSC/HSC/NMMS/SCHOLARSHIP,आदर्श विद्यार्थी विद्यार्थिनी,गरीब व गरजू विद्यार्थी गुणवंत विद्यार्थी विद्यार्थिनी यांना प्रेरणादायी दाते यांच्यावतीने बक्षीस वितरण कार्यक्रम ,खवटी पंचक्रोशी शिक्षण संस्थेकडून कंपास, वह्या, पेन, पेन्सिल
वाटप,इयत्ता नववी मधील विद्यार्थी कुमार दक्ष पोवार या विद्यार्थ्याची आत्या सौ रेश्मा हनुमंत जाधव यांच्याकडून २९ डझन A4 साईज वह्या वाटप,इयत्ता सहावीच्या सर्व विद्यार्थ्यांना पालक श्री प्रशांत सुतार यांच्याकडून पेन वाटप करण्यात आला

या कार्यक्रमासाठी सर्व विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप (जिलेबी)खवटी पंचक्रोशी शिक्षण संस्था सदस्य श्री मन्सूरभाई अब्दुलहमीद जोगीलकर यांच्यावतीने केले शाळा व्यवस्थापन सदस्य सौ.लक्ष्मी नितीन दळवी यांनी पाल्याच्या वाढदिवसानिमित्त तसेच खवटी ग्रामपंचायत यांच्या वतीने सर्व विद्यार्थ्यांना चॉकलेट वाटप केले खवटी पंचक्रोशी शिक्षण संस्था खवटी यांच्या वतीने व प्रशाळेचे माजी विद्यार्थी सन २००८ ते २०१२ बॅचच्या विद्यार्थ्यांच्या वतीने मुख्याध्यापक व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांना पुष्पगुच्छ व भेट देऊन अभिनंदन केले.या कार्यक्रमासाठी खवटी पंचक्रोशी शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष श्री दिलीप राणे , संस्थासचिव श्री चंद्रकांत दळवी, सहसचिव सौ माधवी दळवी, संचालक मा .श्री सुरेश शिंदे, सल्लागार मा .श्री यशवंत मोरे, पोलीस पाटील श्री अमोल दळवी,सरपंच श्री शैलेश दळवी, ग्रामस्थ उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आभार श्री विजय दळवी सर यांनी केले.
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space













