ध्वजारोहणास गैरहजर; कारवाईची मागणी?

रायगड (तळा) :- तळा तहसील कार्यालयाच्या प्रांगणात मुख्य शासकीय ध्वजारोहण करण्यात आले या ध्वजारोहण कार्यक्रमास तळा पंचायत समिती मधील अधिकारी आणि कर्मचारी गैरहजर होते. गैरहजर राहणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांवर महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम १९७९ च्या नियमानुसार कार्यवाही 
करण्यात यावी, अशी विनंती तहसील कार्यालयात उपस्थित असलेल्या तळेवासियांनी केली. ७६ वा स्वतंत्र दिन ध्वजारोहण समारंभ मुख्य शासकीय कार्यक्रम १५ ऑगस्ट रोजी तहसील कार्यालयाच्या प्रांगणात पार पडला. याप्रसंगी तहसीलदार स्वाती पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. कार्यक्रमासाठी विविधशासकीयकार्यालयांचेअधिकारी,कर्मचारी,लोकप्रतिनिधी,विविध राजकीय पक्षांचे प्रमुख,माजी सैनिक,पत्रकार,विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमास पंचायत समिती कार्यालयातील अधिकारी व कर्मचारीच गैरहजर असल्याचे यावेळी जाणवले. याबाबत उपस्थितांमध्ये चर्चा सुरू झाली. विशेष म्हणजे हे अधिकारी पंचायत समिती इमारतीत पहिल्या मजल्यावरून ध्वजारोहणाचा कार्यक्रम पाहत होते पण ध्वजारोहणास सलामी देण्यास खाली आले नाही त्यामुळे या कर्मचाऱ्यांनी महाराष्ट्र शासन राजशिष्टाचार परिपत्रक एप्रिल २०१६ ची अवहेलना करून राष्ट्रीय कार्यक्रमाचा अनादर केल्याचे स्पष्ट झाले.या परिपत्रकानुसार गैरहजर अधिकारी-कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करावी, अशी मागणी उपस्थित असलेल्या मान्यवरांनी तहसीलदार यांच्याकडे केली आहे. 
७६ वा स्वतंत्र दिन ध्वजारोहण समारंभ मुख्य शासकीय कार्यक्रम पार पडल्यानंतर तहसील कार्यालयाच्या दालनात छोटेखानी बैठक पार पडली यावेळी स्वतंत्र दिनाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या नंतर तळेवासियांनी तालुक्यातील अडचणींचा पाढाच तहसीलदार स्वाती पाटील यांच्या समोर मांडला मेढे ग्रामपंचायत सरपंच मधुकर वारंगे यांनी मेढे आदिवासी वाडी येथे मोठ्या प्रमाणावर गावठी दारूची निर्मिती आणि विक्री होत असल्याने अनेकांचे संसार उध्वस्त झाले असून अती सेवनाने मृत्यूचे प्रमाण वाढले असल्याचे सांगून येथे कायमची दारू बंदी व्हावी अशी विनंती केली,अनेक तक्रारी करून देखील त्याची दखल घेतली जात नसल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष कैलास पायगुडे यांनी 
तळा पंचायत समिती येथील पदाधिकारी आणि कर्मचारी ऑन ड्युटी मद्य प्राशन करून कार्यालयात वावरत असल्याची तक्रार केली, तर तहसील,पंचायत समिती नगरपंचायत येथे मुख्य अधिकारी गैरहजर असल्याने तालुक्यातील नागरिकांची कामे कशी मार्गी लागणार असा प्रश्न उपस्थित करण्यात आला, थम इंप्रेशन मशीन प्रत्येक कार्यालयात उपलब्ध करून सर्व अधिकारी वर्गाला मुख्यालयी राहण्याचे आदेश तहसीलदार यांनी काढावे अशी सूचना करण्यात आली. पोलिस निरीक्षक कैलास डोंगरे यांनी सर्व सुचनांचे प्रशासनाच्या वतीने दखल घेण्यात आली असून त्यावर योग्य त्या उपाय योजना करण्यात येतील असे सांगितले तहसीलदार स्वाती पाटील यांनी ७६ वा स्वतंत्र दिनाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या.यावेळी नगराध्यक्षा अस्मिता भोरावकर, उपनगराध्यक्ष चंद्रकांत रोडे,मुख्याधिकारी माधुरी मडके,पोलिस निरीक्षक कैलास डोंगरे,नगरसेवक,पंचायत समिती माजी सदस्य,सरपंच,उपसरपंच,विविध पक्षांचे प्रमुख आणि तळेवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space













