नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , तळ्यामध्ये ७७ वा स्वतंत्र दीन उत्साहात – आजचा महाराष्ट्र

तळ्यामध्ये ७७ वा स्वतंत्र दीन उत्साहात

प्रतिनीधी संजय रिकामे

रायगड (तळा) :- तळा तालुक्यात ठिक ठिकाणी स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवात देशाचा ७७ वा स्वातंत्र्य दिन कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. तळा तहसील कार्यालयात देशाचा ७७ वा स्वातंत्र्य दिन दिमाखात साजरा करण्यात आला.तळा तहसीलदार स्वाती पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.यावेळी पोलिसांनी ध्वजाला मानवंदना दिली.याप्रसंगी तळा पोलिस निरीक्षक, पोलिस अधिकारी, विविध शासकीय अधिकारी,

विविध राजकीय पक्षांचे नेते, पुढारी, लोकप्रतिनिधी,पत्रकार, विद्यार्थी आदी उपस्थित होते. तळा नगरपंचायत येथे नगराध्यक्षा अस्मिता भोरावकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी उपनगराध्यक्ष चंद्रकांत रोडे, नगरसेवक, नगरसेविका,कर्मचारी उपस्थित होते. तळा पंचायत समितीच्या प्रांगणातही अधिकारी, माजी सदस्य, कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत ध्वजारोहण करण्यात आले.तालुक्यातील विविध शासकीय कार्यालय,माध्यमिक शाळा,विद्यालय येथे ध्वजारोहण करण्यात आले.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]