नवेगाव बांध पर्यटकांचे आकर्षक केंद्र पर्यटन ठिकाणी वृक्ष ,तलाव, जंगल सफारी ,लाल बंदर व झुले

पक्ष्यांच्या किलबिलाट ,प्राण्यांचा अभाव, पर्यटक नाराज प्रशासनाने लक्ष देण्याची गरज
गोंदिया :- जिल्ह्यातील नवेगाव बांध पर्यटन क्षेत्र निसर्गाच्या कुशीत दडलेला असून या पर्यटन स्थळाला १५ ऑगस्ट २०२३ ला प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघटनेचे राज्य सरचिटणीस संजीव भांबोरे यांनी आपल्या सहकार्यांसोबत भेट दिली असता पर्यटकांची एकच गर्दी उसळलेली होती. परंतु त्या ठिकाणी 
वृक्षवल्ली ,तलाव, जंगल सफारी, लाल बंदरे, विश्राम भवन, रेस्टॉरंट, मुलांना खेळण्याचे झुले ,संजय कुटी आढळून आले .त्या ठिकाणी पक्षी, प्राणी यांचे कठळे बांधलेले दिसले. परंतु ते कठळे ओसाट परिस्थिती त्या ठिकाणी आढळून आले आहेत. त्या ठिकाणी कोणतेही प्राणी ,पक्षी आढळून आलेले नाही .त्याचप्रमाणे निसर्गाच्या कुशीत नवेगाव बांध पर्यटन क्षेत्र दडलेला असताना सुद्धा त्या ठिकाणी पक्षांच्या किलबिलाट सुद्धा आढळून आलेला नाही .फक्त मौज म्हणून फिरण्याकरता नवेगाव बांध पर्यटन क्षेत्र एवढ्या पुरताच मर्यादित राहिलेला आहे .शासनाने या ठिकाणी बऱ्याच सोयी सवलती पर्यटकांच्या दृष्टीने उपलब्ध करून देण्याची गरज आहे .यावेळी त्यांच्यासोबत सामाजिक कार्यकर्ते कुलदीप गंधे ,महफूज कुरेशी ,मकसूद कुरेशी ,प्रल्हाद चंदनबटवे ,सुयोग फटीक ,बाळू फटीक ,सय्यद इरफान पटेल, शैलेश शहारे यावेळी उपस्थित होते.
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space













