बेरोजगार तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यासाठी काळकाई कृपा स्वयंरोजगार सर्व सेवा संस्थेची स्थापना

रत्नागिरी (खेड) :- खेड तालुक्यातील तरुणांनी , बेरोजगार तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यासाठी तसेच सामान्य लोकांच्या शासकीय कामासाठी सुलभता आणण्यासाठी काळकाई कृपा स्वयं रोजगार सर्व सेवा या संस्थेची स्थापना केली आहे. 
नुकत्याच या संस्थेवर श्री विजय खोतू दरेकर यांनी अध्यक्ष ,श्री शांताराम म्हसकर यांची उपाध्यक्ष, श्री बाबू तांबे यांची सचिव, श्री मंगेश सागवेकर यांची सह सचिव व श्री महेश जगदाळे यांची खजिनदार म्हणून नियुक्ती झाली आहे. इतर संचालक श्री महेश मधुकर दळवी,श्री देवेंद्र जाधव, श्री संतोष हिरू पवार,श्री योगेश दरेकर आणि बाजी सुर्वे अशी आहेत.

लवकरच लोकांच्या सेवेसाठी खवटी व भरणे नाका येथे कार्यालय सुरू करण्यात येतील. सभासद नोंदणी साठी कृपया श्री बाबू तांबे यांना 96652 91438 या क्रमांकावर संपर्क करावा अशी विनंती संस्थेमार्फत करण्यात आली आहे.
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space













