कधीही मतांचे राजकारण न करता रोहेकरांना पायाभूत सुविधा कशा मिळतील याच उद्दात हेतूने रोहा नगरपालिकेत मराठा भवन उभे राहिले ; खा. सुनिल तटकरे
रायगड (रोहा) :- आम्ही राजकारण जरूर करतो, परंतु नगरपालिका हद्दीत विकासकामे करताना एखाद्या भागात किती मतदान आहे. मतदार यादीत नाव आहे की नाही हे आम्ही कधीही पाहात नाही, त्यामुळे कधीही मतांचे राजकारण न करता रोहेकरांना पायाभूत सुविधा कशा मिळतील त्याचा लाभ समस्त रोहेकरांना कसा मिळेल याच उद्दात हेतूने मराठा भवन उभे राहिले असल्याचे वक्तव्य खा. 
सुनिल तटकरे यांनी केले.रोहा नगरपालिका हद्दीत महाडा वसाहतीत शासनाच्या वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून शासनाच्या ७५ लाखाच्या निधीतून मराठा भवन बांधण्यात आले. त्या इमारतीचा लोकार्पण सोहळा खा. सुनिल तटकरे यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी ते बोलत होते यावेळी व्यासपीठावर महिला व बाल कल्याण विकास मंत्री आदिती तटकरे आमदार अनिकेत तटकरे रायगड जिल्हा राष्ट्रवादी अध्यक्ष मधुकरजी पाटील माजी नगराध्यक्ष संतोष पोटफोडे सकल मराठा समाज अध्यक्ष अप्पा देशमुख मराठा समाज अध्यक्ष अमित उकडे.रावसाहेब सरफळे, महमद डबीर, शिंदे सर,माजी उपनगराध्यक्ष मयूर दिवेकर महेंद्र गुजर नगरसेवक अहमद दर्जी नगरसेविका सारिका पायगुडे महेंद्र कोलटकर चंद्रकांत पार्टे मयुर पायगुडे, रवी चालके, अनंतराव देशमुख, सरोजनी शिंदे रत्नप्रभा कापरे प्राजक्ता चव्हाण अधिक कार्यकर्ते उपस्थित होते सुनील तटकरे पुढे म्हणाले की रोहा शहरांमध्ये महिला भवन, महिला जिमनाशियम, नाट्यगृह, मल्टिप्लेक्स, शिवसृष्टी असे विविध दालन उभे राहत आहेत. बारामतीच्या धरतीवर सुसज्ज व आकर्षक अशा इमारती उभ्या राहत आहेत. त्यांचे जतन करा, इमारती इतक्या बघण्याजोगे असतील की अशा दर्जेदार इमारती आमच्या रोह्यात येऊन प्रतेकांने पहावे असे प्रत्येकाला वाटले पाहिजे असे तटकरे म्हणाले.उपमुख्यमंत्री अजित दादांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करीत असताना मंत्री अदिती तटकरे यांना निधी मिळाला व अनेक कामे मी सुचवली, पण आदितीने आधीच कामे ठरवली होती, काय करणार मंत्री आहे ना असे मिस्कीलपणे तटकरे म्हणाले, अदितीने या मराठा भवनाच्या परिसरा करिता ७५ लाखाचा निधी
सुशोभिकरणाकरिता मंजूर केला आहे. आदिती महिला बाल विकास मंत्री असल्याने महिलांबचत गटाकरिता ५०००० चा फिरता निधी उपलब्ध झाला आहे. रोहा तालुक्यात बचत गट भवन देखील उभे राहिल . या मराठा भवनाला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव द्या जेणेकरून तुमची जबाबदारी देखील वाढेल असे खासदार सुनील तटकरे म्हणाले. सध्या माहितीच्या अधिकाराखाली माहिती मागवण्याची वृत्ती फोफावली असून त्यांना त्यांचे काम करू द्या 
आपण आपले काम करीत राहायचे असेही खासदार सुनील तटकरे म्हणाले यावेळी आमदार अनिकेत तटकरे यानी विचार मांडताना रोहा नगरपालिका स्थापनेला १५० वर्ष जास्त झाली पण येत्या ५ वर्षात जी कामे झाली .ती १५० वर्षात झाली नाहीत. इतकी कामे झाली. कुठल काम प्रलंबित राहिल असे नाही असे अनिकेत तटकरे म्हणाले तर यावेळी मंत्री आदिती ताई यानी सुधा सभेस संबोधित केले.यावेळी माजी नगराध्यक्ष संतोष पोटफोडे यांनी आपल्या नेत्यांनी केलेल्या विकास कामांची जान ठेऊन काम करु या वरिस्ट पातळीचे राजकारण फार मनावर घेऊ नका आपला विकास करण्यास आपले नेते सक्षम आहेत.असे ते म्हणाले.यावेळी प्रस्ताविक मुख्याधिकारी पंकज भुसे यानी तर आभार प्रदर्शन मराठा समाजाचे अध्यक्ष अमित उकडे यानी मानले.
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space













