नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , रायगड जिल्ह्यात कुणबी समाज पुन्हा एकदा सक्रिय – आजचा महाराष्ट्र

रायगड जिल्ह्यात कुणबी समाज पुन्हा एकदा सक्रिय

प्रतिनीधी संजय रिकामे

रविशेठ मांडवकर तळा तालुक्यातील कुणबी समाज नेते म्हणून एकमत

रायगड (तळा) :- मागील दोन्ही लोकसभा निवडणुकांमध्ये जातीच्या गणीतापेक्षा रायगड जिल्हा मोदी लाटेवर अधिक हेलकावे खाताना पाहायला मिळाला हे जरी खरे असले तरी राज्यात नुकत्याच बदललेल्या राजकीय समीकरणानंतर पुन्हा एकदा ग्रामीण भागात कुणबी समाजाच्या हालचालींना वेग आला आहे.कुणबी समाजोन्नती संघ मुंबई संलग्न रायगड जिल्हा कुणबी समन्वय समिती सभा रविवार (दि.१३ ऑगस्ट) कुणबी भवन येथे सकाळी ११.०० वाजता पार पडली या सभेसाठी माणगाव नगरपंचायत नगराध्यक्ष तसेच रायगड जिल्हा कुणबी समन्वय समिती अध्यक्ष ज्ञानदेव पवार, ओबीसी संघर्ष समिती रायगड जिल्हा अध्यक्ष सुरेश मगर,उदय कठे,शंकर भगत,शिवराम महाबळे,रमेश नवले,श्री सुभाष लाले,रत्नाकर लांबाडे,जनार्दन चापडे, सचिन कदम साहेब,श्री शिवराम शिंदे साहेब,श्री महादेव पाटील,प्रदीप लोखंडे,महेंद्र पेटारे, श्री नामदेव काप,रवींद्र मांडवकर,राम सावंत,सतीश शिगवण,रोहा पंचायत समिती माजी सभापती व माजी जिल्हा परिषद सदस्य श्री रामचंद्र सकपाळ आणि विविध तालुक्यातील सर्वच पदाधिकारी उपस्थित होते.

या सभेमध्ये रायगडात कुणबी समाज बहुसंख्येने असला तरी विधानसभा विधान परिषद लोकसभा राज्यसभा प्रतिनिधीत्वापासून दूर आहे. ओबीसी नेतृत्वाला संधी दिली पाहिजे, असे सारेच सांगतात. परंतु राजकीय पक्ष उमेदवारी देण्याचे कबूल करून फसवतात आम्ही मोठ्या संख्येनं आहोत पण, आमच्या लोकप्रतिनिधींची संख्या मात्र अपेक्षित अशी नाही.कुणबी समाजाला नेतृत्व मिळाले पाहिजे मग ते ग्रामपंचायत पासून पंचायत समिती जिल्हा परिषद विधानसभा विधान परिषद लोकसभा राज्यसभा या ठिकाणी कुणबी समाज मोठा असल्याकारणाने प्राधान्य मिळाला पाहिजे आमदार खासदार कुणबी समाजाचे असतील तर कुणबी समाजाचे प्रलंबित प्रश्न विधानसभेत लोकसभेत सुटतील अशी चर्चा करण्यात आली.तळा तालुक्यात समाज नेते अशोकशेठ लोखंडे यांच्यानंतर समाज नेते बाळशेट लोखंडे होऊन गेले बाळशेठ यांच्या निधनानंतर समाजाला तळा तालुक्यात समाज नेता म्हणून रवींद्र मांडवकर यांना यापुढे समाज नेते म्हणून सर्वानुमते घोषित करण्यात आले.यावेळी समाजातील चालीरीती रिवाज रूढी परंपरा यांची नियमावली तळा तालुक्यात आहे त्याचप्रमाणे संपूर्ण जिल्ह्यात त्याची अंमलबजावणी करावी अशी ही चर्चा करण्यात आली.कार्यक्रमाच्या सुरवातीला छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून मान्यवरांचे स्वागत करण्यात आले.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]