नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , मेसर्स PIL MUMBAI PVT LTD यांच्या सौजन्याने ९ शाळांना भव्य शैक्षणिक साहित्याचे वाटप – आजचा महाराष्ट्र

मेसर्स PIL MUMBAI PVT LTD यांच्या सौजन्याने ९ शाळांना भव्य शैक्षणिक साहित्याचे वाटप

पत्रकार राजेंद्र दळवी

रत्नागिरी (खेड) :- शुक्रवार दिनांक ११-ऑगस्ट-२०२३ रोजी– मेसर्स पी.आय.एल. मुंबई प्रायव्हेट लिमिटेड(PIL MUMBAI PVT.LTD- SINGAPORE BASE SHIPPING LINE)

यांच्या सौजन्याने मेजर ग.ह.पवार हायस्कूल, चिंचवली-बोरघर ता. खेड(रत्नागिरी) या ठिकाणी उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते बोरघर पंचक्रोशीतील सात जि. प. शाळा आणि दोन माध्यमिक विद्यालय यांना मोफत भव्य डीजिटल शैक्षणिक साहित्य आणि RO water filter चे वाटप कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री कॅप्टन संजय गुजराल- मेसर्स पी.आय. एल. मुंबई प्रायव्हेट लिमिटेड ,कार्यकारी संचालक( Executive Director) आणि मिस तृप्ती राजेश कुंदर- कार्यकारी संचालक –वित्त प्रमुख लेखा आणि मानवसंसाधन प्रशासन,श्रीमती गुजराल, श्री आदित्य गुजराल, Executive प्रतिनिधी मिस कोमल , मिस सोमैया, श्री प्रतिक जाधव, श्री गणेश यांच्या शुभहस्ते करण्यात आले. या शुभ सोहळयात मेजर ग.ह.पवार हायस्कूल,चिंचवली -बोरघर, जि.प.शाळा बोरघर-घोलपवाडी, जि.प. शाळा बोरघर न.१, जि.प. आदर्श शाळा नातुनगर प्रकल्प, शाळा तुळशी बुद्रुक,शाळा तुळशी खुर्द(कोंड), आदर्श शाळा दिवाणखवटी गणपती, शाळा कळंबणी वाळंजगाव आणि माध्यमिक विद्यालय शीव-खुर्द या शाळांना वितरित करण्यात आले.

सदर कार्यक्रमात खवटी प्रभागाचे शिक्षण विस्तार अधिकारी मा. श्री.संतोष भोसले साहेब यांचा गुणवंत अधिकारी म्हणून मान्यवरांचे शुभहस्ते यथोचित सत्कार करण्यात आला. तसेच या कार्यक्रमासाठी नातुनगर केंद्राचे केंद्र प्रमुख श्री. अंकुश उंडे सर, श्रीमती इंगळे मुख्याध्यापिका मेजर ग.ह.पवार हायस्कूल चिंचवली- बोरघर, सर्व सहभागी शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक वर्ग, शाळा व्यवस्थापन समिती प्रतिनिधी, आजचा महाराष्ट्र टॉप टेन न्युज पत्रकार श्री. राजेंद्र दळवी, ग्रामस्थ , पालक व विध्यार्थी उपस्थित होते.

या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी वेदांत क्लासेस- श्री अनिल पार्टे सर आणि आकार फाऊन्डेशन बोरघर यांचे सर्व प्रतिनिधी- श्री जयराम चव्हाण, समीर म्हाब्दी, निलेश मांडवकर, श्री श्रावण पार्टे, श्री चिराग पार्टे, आणि शाळा बोरघर-घोलपवाडी शिक्षक व माता-पालक संघ यांनी विशेष मेहनत घेतली.या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्र संचालन बोरघर-घोलपवाडी शाळेचे पदवीधर शिक्षक श्री नरेश ठोंबरे यांनी केले

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]