महसूल सप्ताह निमित्ताने एक हात मदतीचा कार्यक्रम २१ गणपती मंदिर येथे संपन्न.
प्रतिनिधि सुधागड
रायगड (सुधागड) :- महाराष्ट्र शासन अंतर्गत सुधागड महसूल कार्यालयाच्या वतीने आदिवासी बांधवांसाठी एक हात मदतीचा व नैसर्गिक आपत्ती या विषयी उपक्रम राबविण्यात आला. या कार्यक्रमात १) घरठान १७ ब अंतर्गत एकूण १२६ लाभार्थ्यांना ७/१२वाटप करण्यात आला. तसेच नैसर्गिक आपत्ती मुळे चीमा पांडू 
वारा यांच्या कुटंबाला रोख 4लाख रुपयांचे चेक देण्यात आले तसेच म्हैस पाण्यात वाहून गेल्यामुळे सबंधीतांना २५ हजार रुपयांचे चेक देण्यात आले. तसेच ३७,५०० रू. मदतीचा वाटप करण्यात आला. आणि कातकरी व वंचित मतदारांची मतदार यादीमधी नाव नोंदणी करून घेण्यासाठी फार्म वाटप करण्यात आले.२५ लाभार्थ्यांना रेशन कार्ड वाटप करण्यात आले या प्रसंगी उप विभागीय अधिकारी अरुण हंडे, सुधागड पाली तहसीलदार उत्तम कुंभार, पाली नायब तहसीलदार , ज्ञानेश्वर अडसूळ, सिद्धेश्वर सरपंच सौ आशीका पवार, उप सरपंच शरद किंजावडे, माजी सरपंच व सदस्य सौ समृध्दी संतोष यादव या मान्यवरांच्या उपस्थितीत एक हात मदतीचा कार्यक्रम पार पडला.
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space













