नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , रोहा तालुका कुणबी समाज तालुका कार्यकारणीची सभा शिवराम शिंदे अध्यक्ष यांच्या उपस्थित संपन्न – आजचा महाराष्ट्र

रोहा तालुका कुणबी समाज तालुका कार्यकारणीची सभा शिवराम शिंदे अध्यक्ष यांच्या उपस्थित संपन्न

प्रतिनिधि समीर बामुगडे

रायगड (रोहा) :- कुणबी समजोन्नोती संघ मुबंई ,ग्रामीण शाखा -रोहा यांचे माध्यमातून तालुका स्तरावर चणेरा विभाग ,धाटाव विभाग,कोलाड विभाग,ऐनघर विभाग, नागोठणे विभाग,सोनगाव विभाग कुणबी समाज ग्रुप जसे कार्यान्वीत झाले आहे .त्याचा आदर्श इतर विभागीय कुणबी समाज ग्रुपने घेतला पाहिजे याकरिता पुन्हा प्रत्येक ग्रुपने आपल्या समाज बांधवांना एकत्र करून कमिटीची पुनर्बांधणी करण्यात यावी.असे आवाहन अध्यक्ष शिवराम शिंदे यांनी केले.

कुणबी समाजाचे मुंबई संघांवर आपल्या रोहा तालुक्यातील समाज नेते शंकरराव म्हसकर, मा.पं.स.उपसभापती रोहा रामभाऊ सकपाळ , समाज नेते रायगड जिल्हा ओ बी.सी.अध्यक्ष सुरेश मगर ,शकर भगत, यांची निवड करण्यात आली.यावेळी उपस्थित समाज नेते रामचंद्र सकपाळ यांनी ज्या प्रमाणे चणेरा ग्रुपने ज्या सामाजिक नियमावली तयार केली आहे तीच सर्व तालुक्यातील समाज बांधवांनी आचरण करावे.तसेच सुरेश मगर यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सर्व ग्रुप मधील गावपातळीवर कुणबी समाज जनगणना करण्यात यावी.रोहा तालुका कुणबी समाज उपाध्यक्ष मारुती खांडेकर, रोहा तालुका कुणबी समाज उपाध्यक्ष गोपीनाथ गंभे, रोहा तालुका कुणबी समाज सेक्रेटरी दत्ताराम झोलगे,रोहा तालुका कुणबी युवक अध्यक्ष अनंत थिटे,सुहास खरीवले, सतिश भगत चणेरा ग्रुप अध्यक्ष नरेद्र सकपाळ, धाटाव ग्रुप अध्यक्ष दिनेश रटाटे,सोनगांव ग्रुप अध्यक्ष खेळु ढमाल,ऐणघर ग्रुप अध्यक्ष यशवंत हळदे, धाटाव ग्रुप शशिकांत कडू, शंकर कदम महेश तुपकर , विनोद बाईत, नामदेव म्हसकर, किशोर रटाटे,सह तालुक्यातील जेष्ठ श्रेष्ठ कुणबी समाज बांधव व आदी कार्यकरणी सभासद उपस्थित होते.यावेळी धाटाव ग्रुप मधील कमेटी व चणेरा ग्रुप कमेटीचे सत्कार करण्यात आला.तसेच जय भवानी बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित संस्थेवर कुणबी समाजचे संचालक बिनविरोध निवडून आल्याबद्दल त्याचा सुध्दा सत्कार करण्यात आला.तर ओबिसी रायगड जिल्हा अध्मक्ष कुणबी समाज नेते सुरेश मगर यांनी आपले विचार मांडताना सांगितले की आपण आपल्याला प्रत्येक गाव वाडीमध्ये कुणबी समाजाची किती घर आहेत लोकसंख्या सह जनगणना केली पाहिजे. असे आवाहन समाज बांधवांना यावेळी केले .जेष्ठ समाज नेते शिवराम महाबंळे यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना सांगितले की मुंबई संघावर जास्तीतजास्त आजीव सभासंदांची नोंदणी करा.कुणबी समाजातील आजच्या सामाजिक परिस्थिती वर जेष्ठ नेते रायगड जिल्हा कुणबी समाज उपाध्यक्ष शंकरराव भगत,अंनत थिटे, शशिकांत कडू यांनी देखील समाजाविषयी आपले मनोगत व्यक्त केले.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]