शिवसेना जिल्हा प्रमुख प्रमोद घोसाळकर यांचा वाढदिवस आमदार भरतशेट गोगावले व जिल्ह्यातील पदाधिकारी यांच्या उपस्थितीत साजरा

शिवसेना वाढवण्यात घोसाळकरांचे मोठे योगदान-भरतशेट गोगावले.
रायगड (माणगाव) :- शिवसेना दक्षिण रायगड जिल्हाप्रमुख प्रमोद घोसाळकर यांच्या वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन सोहळा व दक्षिण रायगड जिल्हा शिवसेना पदाधिकारी मेळावा लोणेरे विभागातील अंबर्ले येथे २८ जूलै रोजी संपन्न झाला.

६३ व्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात दक्षिण रायगड जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकारी बहुसंख्येने उपस्थित होते. शिवसेना पक्षवाढीसाठी प्रमोद घोसाळकर यांचे मोठे योगदान आहे. ३५ वर्षाहून अधिक काळ त्यांनी राजकारणासह समाजकारणात व्यतीत केला असून जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांची नेहमीच तळमळ दिसून येते. प्रमोद घोसाळकरांसह आपण जिल्हा परिषद सदस्य असतानापासून काम करत आहोत. सोबत काम करताना दोघांचिही चांगली मैत्री झाली तेव्हापासून त्यांची खंबीर साथ असल्याचे उद्गार आमदार भरत गोगावले यांनी केले असून जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूकीसाठी कामाला लागा. दक्षिण रायगडमध्ये शिवसेना क्रमांक एकचा पक्ष करण्यासाठी वाट्टेल ते करा लागणारी मदत देण्याचे काम आम्ही वरीष्ट पदाधिकारी करू. असे आवाहन आमदार भरत गोगावले यांनी केले.
घोसाळकरांनी भरत गोगावले यांना नेहमीच मदत केली आहे. पहिल्या टर्मला भरत यांना आमदार करण्यात घोसाळकरांचा मोठा वाटा होता. घोसाळकरांचे व आपले कौटुंबिक संबंध नेहमीच जिव्हाळ्याचे राहिले आहेत. श्रीवर्धन व महाड विधानसभा मतदार संघात त्यांचे काम मोलाचे असून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा युवासेना कोअर कमिटी सदस्य विकास गोगावले यांनी दिल्या.
प्रमोद घोसाळकर यांच्यासोबत आपण शालेय जिवनापासून सोबत काम करत आहोत. मांगरूळ ग्रामपंचायतीपासून आम्हा दोघांचा राजकीय प्रवास सुरू झालेला तो प्रवास आजतागायत सोबत असून त्यांना निरोगी आयुष्चाच्या शुभेच्छा जिल्हा संपर्क प्रमुख अरूण चाळके यांनी केले.
शुभेच्छा देण्यासाठी जिल्हाभरातून आपण पदाधिकारी आलात त्याबद्दल सर्वांचे आभार मानत पुढील निवडणूकीसाठी सर्व पदाधिकारी यांनी कामाला लागण्याचे आवाहन करत लवकरच आपले आमदार हे नामदार होणार असून विकासकामांच्या बाबतीत महाराष्ट्रात आमदार गोगावले यांनी एक नंबर मिळवला आहे त्यांच्याच साथीने श्रीवर्धन विधानसभा मतदार संघात करोडोंची विकासकामे केली असून महाडसह श्रीवर्धन विधानसभा मतदार संघात देखील भविष्यात शिवसेनेचे निर्विवाद वर्चस्व मिळवण्यासाठी कामाला लागण्याचे आवाहन प्रमोद घोसाळकर यांनी केले.
प्रमोद घोसाळकर यांच्या वाढदिवसानिमित्त ब्लॅंकेट वाटप, शालेय वस्तुंचे वाटप अशी समाजपयोगी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. शिवसेनेसाठी सर्वंच राजकीय पक्षांच्या विविध पदाधिकारी यांनी प्रमोद घोसाळकर यांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी महिला जिल्हाप्रमुख निलिमा घोसाळकर, युवासेना जिल्हाप्रमुख विपुल उभारे,
ग्राहक संरक्षण कक्ष जिल्हाप्रमुख निलेश म्हात्रे, उपजिल्हाप्रमुख मुश्ताक मुकादम, उपजिल्हाप्रमुख विजय सावंत, श्रीवर्धन विधानसभा संपर्क प्रमुख सचिन पाटेकर, महाड विधानसभा प्रमुख चंन्द्रकांत जोरकर, माणगाव नगराध्यक्ष ज्ञानदेव पवार, उपजिल्हा प्रमुख शर्मिला सुर्वे, सपना मालुसरे, युवासेना उपजिल्हाप्रमुख अविनाश नलावडे, वैभव मोरे, महाड तालुका प्रमुख सुरेश महाडीक, पोलादपूर तालुकाप्रमुख निलेश अहिरे, रोहा तालुकाप्रमुख मनोज शिंदे, तळा तालुकाप्रमुख प्रद्युम्न ठसाळ, श्रीवर्धन तालुका प्रमुख प्रतोष कोलथकर, म्हसळा तालुकाप्रमुख प्रसाद बोर्ले यांच्यासह दक्षिण रायगडचे शिवसेना, युवासेना, महिला आघाडी पदाधिकारी उपस्थित होते.
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space













