नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , रोहा तालुक्यातील भालगाव येथील तलाठी संतोष चांदोरकर लाच स्वीकारताना अटक – आजचा महाराष्ट्र

रोहा तालुक्यातील भालगाव येथील तलाठी संतोष चांदोरकर लाच स्वीकारताना अटक

प्रतिनिधि समीर बामुगडे

फेरफार नोंद मंजूर करून उतारा देण्यासाठी केली होती लाचेची मागणी

रायगड (रोहा) :- रोहा तालुक्यातील सजा भालगाव येथील तलाठी संतोष मनोहर चांदोरकर वय ४३ वर्षे, तलाठी, सजा भालगांव, अति कार्य. सजा वाली, तालुका रोहा, रायगड  वर्ग – ३ राहणार. बेंड्रा कॉम्पलेक्स, रोहा बायपास रोड, तालुका रोहा, रायगड ,यास लाच स्वीकारण्याच्या तयारीत असताना लाच लुचपत प्रतिबंधक विभाग रायगडच्या पथकाने सापळा रचून कारवाई केली आहे. या कारवाईने सर्वत्र खळबळ उडाली आहे.लाचखोर तलाठी

संतोष मनोहर चांदोरकर यांनी तक्रारदार यांना गट क्रमांक ७८३ क्षेत्र ०१-९९-०० या जमिनीचे फेरफार नोंद मंजूर होऊन उतारा देण्याकरिता तक्रारदार यांच्याकडे लाचेची मागणी केली होती.दिनांक ३०/०५/२०२३ रोजी १०,०००/- रुपये लाच स्वीकारण्याची तयारी दर्शवली. लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी कारवाई करून लाचखोर तलाठी संतोष चांदोरकर याचेवर दिनांक २६/०७/२०२३ रोजी रोहा पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]