मंगेशदादा पाटील यांनी ” माणुसकीची साथ , मदतीचा हात”! या संकल्पनेतून इर्शाळवाडी येथील दुर्घटना ग्रस्त आदिवासी बांधवाना केले जीवनावश्यक वस्तूंचे वाटप
खारपाडा प्रतिनिधि सुरेश तांडेल
मंगेशदादा पाटील यांचे इर्षाळवाडीतील दुर्घटनाग्रस्त बंधूभगीनींना एक हात मदतीचा …
रायगड (पेन) :- अलिबाग तालुक्यातील बहिरोळे गावातील काॅंग्रेसपक्षाचे युवा कार्यकर्ते मंगेशदादा पाटील यांचे कार्य वाखाणण्याजोगे आहे.त्यांच्या अंगी तरुणपणी इतके दानीत्व असल्याने अनेकदा त्यांनी पिडीतांना मदत केल्याचे बोलले जाते.रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील इर्षालवाडीवर
आसमाणी संकट ओढावले आणि अनेकांचे संसार क्षणार्धात उध्वस्त झाले. महाराष्ट्रातून वेगवेगळ्या मार्गाने संस्था, संघटना , शासनाच्या आदेशानुसार मदत करत असल्याचे बोलले जाते.या मदतीत काही दानित्व, दानशूर देखील कसे बरे मागे रहातील….!मंगेश दादा पाटील यांनी आपल्या संकल्पनेतून या दुर्घटनेच्या पिडीतांना मदत म्हणून आपल्या सहकार्यांना सोबत घेऊन घटनास्थळी जाऊन 
पिडीतबंधूभगीनींना जीवनावश्यक वस्तू व उपयुक्त सामानाचे वाटप केले.यावेळी त्यांचे सहकारी गणेश पाटील, जितेंद्र पाटील,प्रितेश कवळे, सौरभ म्हात्रे,राजू गुरव, मंगेश पाटील,तसेच सुचित थळे,सचिन घाडी,या सर्वांचा दादा रुपेश जाधव , यांच्या समवेत मोलाचा वाटा होता.ही मदत केल्याचे समजताच नेहमी प्रमाणे समाजात मंगेशदादा व त्यांच्या टीमचे सर्वत्र कौतुक केले जात् आहे.
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space













