शिराळा तालुक्याला लाभल्या डॅशिंग तहसीलदार श्यामला खोत मॅडम
सांगली प्रतिनिधि
सांगली (शिराळा) :- शिराळा तालुक्यातील आंबेवाडी ते वाकुर्डे – वाकुर्डे ते महिंदवाडी रस्त्याचे काम पावसामुळे मंदगतीने चालले होते. या कारणास्तव या रस्त्यावरून येजा करताना नागरिकांना अक्षरशः जीवावर उदार होऊन पायपीट करावी लागत होती. सदर रस्त्यावर डम्परच्या येजा करण्यामुळे रस्ता पूर्णपणे खचला होता. कोणतीही गाडी येण्यासाठी वाट शिल्लक राहिली नव्हती गेले पंधरा दिवसांपासुन एसटी सेवा सुद्धा बंद होती त्यामुळे जनतेचा तालुक्यामधील संपर्क पूर्णपणे तुटला होता यामुळे वयोवृद्ध नागरिक, शालेय विद्यार्थी यांना खूप त्रास सहन करावा लागला . एखाद्याला 
अचानक गंभीर आजार झाला तरी हॉस्पिटलमधे घेऊन जाण्यासाठी सुद्धा गाडी येऊ जाऊ शकत नव्हती. या बाबीचे गांभीर्य लक्षात घेऊन आजचा महाराष्ट्र टॉप टेन न्यूजचे उपसंपादक श्री. दिपक मानकर यांनी घटनास्थळी धाव घेऊन सदर ठिकाणाची पाहणी केली करून त्यांनी तत्काळ तालुक्याच्या डॅशिंग तहसीलदार सौ. श्यामला खोत यांना दूरध्वनी वरून संपर्क साधून घटनास्थळाची माहिती दिली व घटनेचे गांभीर्य लक्षात आणून दिले असता तहसीलदार मॅडम यांनी अवघ्या काही वेळातच संबंधित विभागातील कंत्राटदार अभिजीत माळी यांना (DHD infracon Pvt. Ltd) आदेश देऊन रस्ता अगदी पूर्ववत करून दिला त्याबद्दल नागरिकांनी तहसीलदार मॅडम यांचे आभार मानले.
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space













