शेतकर्यांनी शासनाच्या योजनांचा लाभ घ्यावा – आ . भरतशेठ गोगावले

गोरेगांव – लोणेरे प्रेस असोसिएनच्या वतीने शेतकरी सन्मान सोहोळा
रायगड (माणगाव) :- युती सरकारने शेतकर्यांच्या सर्वांगिण विकासासाठी अनेक योजना आणल्या आहेत . त्याचा लाभ शेतकर्यांनी घ्यावा , असे आवाहन करून , आपल्या दारी या अंतर्गत मुख्यमंत्री , उपमुख्य मंत्री आपल्या जिल्ह्यात , तालुक्यात , गावात येवून शासनाच्या शेतकर्यांसाठी असलेल्या योजनांची माहिती तर देतेच पण शेतकर्यांना तेथल्या तेथे या योजनांचा लाभ देत असल्याचे प्रतिपादन आ . भरतशेठ गोगावले यांनी गोरेगांव येथे केले 
रायगड प्रेस क्लब संलग्न त्यांच्या मार्गदर्शनाखाली गोरेगांव – लोणेरे प्रेस असोसिएशन च्या वतीने प्रगतीशील शेतकर्यांना आ. गोगावले यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले , त्यावेळी ते बोलत होते . या कार्यक्रमास सरपंच झुबेर अब्बासी , सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकृष्ण नावले , रायगड प्रेस क्लबचे जिल्हा संपर्क प्रमुख भारत गोरेगांवकर , गोरेगांव लोणेरे प्रेसचे अध्यक्ष केदार खुळे , मधुकर नाडकर यांच्यासह सन्मानपात्र शेतकरी श्रीराम दीपक करकरे आणि रामा सखाराम मोरे , दिनेश हरवंडकर , सचिन शिगवण , मंगेश कदम , नागांवचे सरपंच वामन बैकर तसेच कुणनी युवा मंचचे पदाधिकारी , गोरेगांव ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य आणि परिसरातील शेतकरी वर्ग उपस्थित होता .यावेळी आ . गोगावले यांच्या हस्ते श्रीराम करकरे आणि रामा मोरे या दोन शेतकऱ्यांचा सन्मानपत्र , शाल आणि रोपटे देवून सन्मान करण्यात आला .हा कार्यक्रम यशस्वी करण्यासठी गिरीश गोरेगांवकर , वैभव टेंबे , पियुष भोसले , मुकेश कडू यांनी मेहनत घेतली .
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space













