नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , न्यू इंग्लिश स्कूल खवटी व पि .के दरेकर जुनियर कॉलेजमध्ये आषाढी एकादशी सेलिब्रेशन उत्साहात संपन्न – आजचा महाराष्ट्र

न्यू इंग्लिश स्कूल खवटी व पि .के दरेकर जुनियर कॉलेजमध्ये आषाढी एकादशी सेलिब्रेशन उत्साहात संपन्न

पत्रकार राजेंद्र दळवी

रत्नागिरी (खेड) :- खवटी पंचक्रोशी शिक्षण संस्था खवटी संचलित न्यू इंग्लिश स्कूल व श्री पि. के .दरेकर ज्युनिअर कॉलेज प्रशाळेत शुक्रवार दिनांक ३० जून २०२३ रोजी आषाढी एकादशी उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी इयत्ता पाचवी ते बारावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. शाळेतल्या विद्यार्थ्यांनी वारकऱ्याची वेशभूषा केली होती. तर मुलींनी सुंदर साड्या परिधान केल्या होत्या तसेच विविध उपक्रम करण्यात आले त्यामध्ये दिंडी, भजन, फुगडी घालून विठ्ठलनामाचा जयजयकार करण्यात आला .

यावेळी प्रशालेचे मुख्याध्यापक श्री माळी सर, सौ नवले मॅडम, सौ कोदारे मॅडम ,श्री प्रमोद दळवी सर,सौ बेंडल मॅडम, सौ दळवी मॅडम श्री कावणकर सर, सौ खेडेकर मॅडम श्री विजय दळवी सर,सौ देवळेकर मॅडम व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते या कार्यक्रमाचे संपूर्ण सूत्रसंचालन श्री विजय दळवी सर यांनी केले.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]