नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , भडगाव शेवरवाडीतील विठ्ठल रखुमाई मंदिरात बाल भाविकांनी घेतला दर्शनाचा लाभ – आजचा महाराष्ट्र

भडगाव शेवरवाडीतील विठ्ठल रखुमाई मंदिरात बाल भाविकांनी घेतला दर्शनाचा लाभ

पत्रकार राजेंद्र दळवी

रत्नागिरी (खेड) : – शहराजवळील भडगाव शेवरवाडी येथील विठ्ठल रखुमाई मंदिरात गुरुवारी सकाळी आषाढी एकादशी निमित्त बाल भाविकांनी दर्शनासह प्रसादाचाही लाभ घेतला.

   सकाळी भडगाव येथील अंगणवाडी व जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी आणि विध्यार्थिनींनी आपल्या गुरुजणांसह बाल भाविकांच्या वेषभुषेत मंदिरात येऊन विठ्ठल रखुमाईचे दर्शन घेऊन प्रसादाचाही लाभ घेतला. यावेळी शिवसेना शिंदे गटाचे शाखाप्रमुख श्री. किरण डफळे व त्यांचे सहकारी कार्यकर्ते सचिन सकपाळ , सुरेंद्र मोगरे , सुरज मोगरे , रणजित सकपाळ , योगेश सकपाळ , संदेश इंगळे, अक्षय लाखम , दिनेश डफळे व विठ्ठल रखुमाई देवस्थान मंडळाचे अध्यक्ष महादेव जाबरे यांच्यासह पुजारी श्री. अनंत शिगवण व ग्रामस्थ आणि महिला मंडळाच्या वतीने जि. प. भडगाव उसरेवाडी मुख्याध्यपिका सौ. काताळे , उसरेवाडी अंगणवाडी सेविका सौ. संगीता उसरे , शेवरवाडी अंगणवाडी सेविका सौ. जिजाबाई कोकरे , जि. प. उसरेवाडी शाळेच्या शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्षा सौ. नंदिनी सकपाळ यांच्यासह बाल भाविकांच्या वेषभुषेत असलेल्या सर्व विद्यार्थी विध्यार्थिनींचे स्वागत केले व समाधान व्यक्त केले.यावेळी बाल भाविक व उपस्थित असलेल्या सर्वांना राजगिरा लाडूचे वाटप करण्यात आले.यावेळी विठ्ठल रखुमाई देवस्थान मंडळाच्या ग्रामस्थ व महिला मंडळाने केलेल्या स्वागताने आपण भारावून गेल्याचे जि. प. उसरेवाडी शाळेच्या मुख्याध्यापिका व सहकारी यांनी सांगितले.मंदिरात वर्षभर विविध कार्यक्रम केले जात असतात. या कार्यक्रमानिमित्त येथील ग्रामस्थ व महिला वर्गाची एकजूट वाखाणन्याजोगी असते. आषाढी एकादशी निमित्त पंचक्रोशीतील आबालवृद्ध भाविक दर्शनाचा लाभ घेत असतात.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]