नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , हाशिवरे येथील विलास मोकल यांचे निधन – आजचा महाराष्ट्र

हाशिवरे येथील विलास मोकल यांचे निधन

प्रतिनिधि आलिबाग

रायगड (आलिबाग) :- हाशिवरे येथील सामाजिक कार्यकर्ते विलास जनार्दन मोकल यांचे रविवारी संध्याकाळी ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.ते ६८ वर्षाचे होते.

विलास मोकल हे हाशिवरे येथील रहाणारे असले तरी त्यांचे संपूर्ण जीवन मुबंई येथे गेले. मुबंई पोर्ट ट्रस्ट मध्ये मुकादम या हुद्यावर ते कार्यरत होते.३७ वर्षच्या सेवेनंतर सेवानिवृत्त झाल्यावर आपल्या हाशिवरे या गावी येऊन सामाजिक क्षेत्रात कार्य करत होते.प्रेमळ व सर्वांना सहकार्याची भावना असल्याने त्यांच्या निधनाचे वृत्त कळताच सर्वाना धक्काच बसला.त्याच्या पश्चात पत्नी,दोन मुले व एक मुलगी ,नातवंडे असा परीवार आहे.पत्रकार,अँड.रत्नाकर पाटील यांचे ते सासरे होते.

त्यांच्या पार्थिवावर हाशिवरे येथील वैकुंठधाम येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.त्यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर हजर होते. त्यांचे उत्तरकार्य ३० जून रोजी भुवनेश्वर येथे करण्यात येणार आहेत.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]