होपमिरर फाऊंडेशनचा तिसरा वर्धापन दिन ग्रामीण शाळेत साजरा

शिक्षणाचे महत्त्व ओळखून होपमिरर फाऊंडेशनने १५ जून २०२३ रोजी रा. जी. प, ओवे कॅम्प शाळेत तिसरा वर्धापन दिन साजरा केला. या विशेष प्रसंगी मुलांना पुस्तकांचे वाटप करण्यात आले, जो शिक्षणाचा प्रचार आणि जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने करण्यात आला.
रायगड (पनवेल ):- होपमिरर फाऊंडेशनने तीन वर्षे पूर्ण केली आणि चौथ्या वर्षाच्या दिशेने वाटचाल केली आणि त्यामुळे ग्रामीण शाळेत तिसरा वर्धापनदिन साजरा केला. “प्रत्येक मुलं त्यांची पार्श्वभूमी काहीही असो, त्यांना दर्जेदार शिक्षण मिळायला हवं” आणि म्हणूनच प्राथमिक शिक्षण देऊन त्यांची उन्नती व्हावी यासाठी “शिक्षा” हा प्रकल्पही परत सुरू करण्याची घोषणा केली.

“शिक्षण हे एक शक्तिशाली साधन आहे ज्यामध्ये जीवन बदलण्याची क्षमता आहे. मुलांना ही पुस्तके उपलब्ध करून दिल्याने त्यांना शिकण्याची आवड निर्माण होईल, असे होपमिरर फाऊंडेशनचे संस्थापक रमजान शेख यांनी मुलांना शिक्षणाचे महत्त्व पटवुन देताना सांगितले.
पुस्तकांच्या वाटपामुळे मुलांना केवळ ज्ञानच मिळणार नाही तर आमच्या विद्यार्थ्यात्यांना एक आधार भेटला. होपमिरर फाऊंडेशनने च्या संपूर्ण टीमचे त्यांच्या बहुमोल सहकार्याबद्दल मी मनापासून आभार मानू इच्छितो. असे जगदीश गुंड,रा. जी. प, ओवे कॅम्प शाळेचे प्राचार्य यानी सांगितले.

या कार्यक्रमात होपमिरर फाऊंडेशनचे संस्थापक आणि अध्यक्ष रमजान शेख यांच्याशिवाय उपस्थितांमध्ये अॅड. सुशील महाडिक (अध्यक्ष रामदास आठवले फाउंडेशन), दिनेश तिवारी (उपाध्यक्ष – नवी मुंबई जिल्हा, राष्ट्रवादी), विक्रम पाटील (मराठी कामगार सेना महाराष्ट्र सरचिटणीस), अक्रम शेख, समीर शेख, तुषार पोरजी,रुबिना खान आणि केतकी घराळ.
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space













