नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , भल्या रात्री अपघातस्थळी देवासारखे धावून आले विष्णुभाऊ लोखंडे:आपल्या नावाप्रमाणे विष्णूचा अवतार घेऊन वाचवले अनोळखी तरुणाचे प्राण. – आजचा महाराष्ट्र

भल्या रात्री अपघातस्थळी देवासारखे धावून आले विष्णुभाऊ लोखंडे:आपल्या नावाप्रमाणे विष्णूचा अवतार घेऊन वाचवले अनोळखी तरुणाचे प्राण.

प्रतिनिधि सोहम जाधव

रायगड (रोहा) :- रोहा कोलाड रस्ता हा रहदारीचा रस्ता, याच रस्त्यावर ठीक ११ वाजता एका अनोळखी तरुणाचा (काही करणास्तव नाव सांगता येत नाही )मोठा भीषण अपघात झाला. अपघात इतका भीषण होता कि त्या तरुणाला जागेवरून उठता सुद्धा येत नव्हतं, अपघात स्थळावरून भरपूर गाड्या जातं होत्या, पण मदतीसाठी कोणतंच वाहन थांबलं नाही. रस्त्यावर अक्षरशः रक्ताचा सडा पडला होता. परिस्थिती अधिकाधिक गंभीर होत होती. तो तरुण मदतीसाठी अक्षरशः रडत होता. या अपघातस्थळा जवळ विष्णू भाई लोखंडे नावाचे देवमाणूस राहतात. जेव्हा त्यांना झालेल्या प्रसंगाची माहिती मिळाली, तेव्हा क्षणाचाही विलंब न करता ऍम्ब्युलन्स ची वाट न बघता आपल चार चाकी वाहन काढल.

आपल्या गाडीमध्ये त्या तरुणला घेतलं,आणि भट हॉस्पिटल मध्ये ऍडमिट केले. सदर तरुण सध्या हॉस्पिटल मध्ये आहे त्याच्यावर उपचार सुरु आहेत, खरंच या काळात माणुसकी संपल्याच चित्र सर्वत्र पाहायला मिळत आहे,दुसऱ्याच्या वेदना,दुःख बघायला माणसाला वेळ नाही. पण याला विष्णभाई लोखंडे हे अपवाद ठरले. खरंच आपल्या नावप्रमाणे विष्णूचा अवतार घेऊन त्या मुलाचे प्राण वाचवले या कामाबद्दल त्यांचं सर्वत्र कौतुक होत आहे.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]