खवटी पंचक्रोशीतील विद्यार्थ्यां साठी खुशखबर
रत्नागिरी (खेड) :- शासकीय सेवा ( नोकर भरती)वर्ग १ ते ३ स्पर्धा परीक्षेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना कळविण्यात आनंद होतो की, सदर परीक्षेच्या अभ्यासाची पुस्तके, शासनाने जिल्हा 
नियोजन रत्नागिरीच्या माध्यमातून जिल्हा वार्षिक योजना सन २०२२-२३ मध्ये *नाविन्यपूर्ण योजना ग्रंथ भेट* योजनेतून *जनसेवक ग्रंथालय खवटीसाठी* उपलब्ध करून दिली आहेत. तरी सदर पुस्तके मोफत वाचनासाठी विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिली 
जातील. तरी याचा लाभ खवटी पंचक्रोशीतील विद्यार्थ्यांनी घ्यावा. यासाठी जनसेवक ग्रंथालय खवटी ( बँक ऑफ इंडिया शेजारी) येथे संपर्क साधून नाव नोंदणी करावी. *ग्रंथपाल- श्री राजेंद्र दळवी, मोबाईल ९०२१०८७७३२

|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space













