कर्तव्यदक्ष, सक्षम उपविभागीय अधिकारी श्री ज्ञानेश्वर खुटवड यांचे आदेश पत्राला केराची टोपली

रोहा जिल्हा रायगड.मा.श्री ज्ञानेश्वर खुटवड यांचे आदेश पत्राला रोहा तहसीलदार श्री देशमुख यांच्याकडून केराची टोपली, बाब माहिती अधिकारत उघड.
रायगड (रोहा) :- महसूल नायब तहसीलदार रोहा श्रीमती निलम ढोरजकर यांनी अधिकार कक्षे बाहेर जाऊन, अधिकार व पदाचा दुरुपयोग करून विवादित फेरफार केस क्रमांक ६० / २०२१ दिनांक १४/ २/ २०२२रोजी बनावट रोजनामा तयार करून अभिलेखात फोजरि करून वादीचे विरुद्ध बेकायदेशीर निर्णय पारित केला आहे

सदरची बाब ही दिनांक १८/०४/२०२३ रोजी अर्जदाराने कार्यालयाकडून प्राप्त झालेला रोजनामाचा प्रमाणितप्रतीवरून बाब उघड झाली आहे.
नायब तहसीलदार महसूल रोहा यांनी खोटा बनावट रोजनामा तयार करून ,प्रतिवादी बरोबर संगणमत व हातमिळवणी करून प्रतिवादीस बेकायदेशीर फायदा देण्यासाठी वादीचे विरुद्ध अभिलेखात फोजरी करून परस्पर बेकायदेशिर निर्णय पारित केला आहे. त्याचबरोबर अभिलेखात फोजरीकरून गुन्ह्याचे कृत्य केले आहे , वादिस क्षती पोहोचवली आहे प्रकरणी त्यांची योग्यती सखोल चौकशी करून, त्यांचेविरुद्ध फौजदारी प्रक्रिया संहिता कलम१९७ अन्वये फौजदारी गुन्हा नोंदविण्याची कार्यवाही करण्यासाठी उप विभागीय अधिकारी यांचेकडे तक्रारदार धर्मेंद्र सिंग यांनी दि.०२/०५/२०२३ रोजी अर्ज दाखल केला होता.

मा.उप विभागीय अधिकारी रोहा यांनी सदर तक्रारी अर्जाची दखल घेऊन दि.०४/०५/२०२३ रोजी तहसीलदार रोहा यांचेकडे तक्रारी अर्जाची सखोल चौकशी तसेचआभिलेखाची पडताळणी करून प्रकरणी वस्तुस्थितीदर्शक सविस्तर अहवाल मागवण्यात आला असता तहसीलदार रोहा,यांनी मा. उप विभागीय अधिकारी रोहा यांचे पत्राची दखल न घेता,भ्रष्ट घोटाळेबाज,महसूल नायब तहसीलदार श्रीमती नीलम ढोरजकर यांची सखोल चौकशी न करता बेकायदेशररित्या, पाठराखण करून, मा. उप विभागीय अधिकारी यांचे आदेशास केराची टोपली दाखवून संबंधीत भ्रष्ट ,घोटाळेबाज अधिकाऱ्याची बेकायेशीररित्या पाठराखण केली आहे, प्रकरणी मा.जिल्हाधिकारी रायगड यांचेकडुन तक्रारी अर्जाची दखल घेऊन, सखोल चौकशी होऊन न्याय मिळेल का?
याची अपेक्षा करतो.
माहिती अधिकार कार्यकर्ता
श्री धर्मेंद्र विजय सिंग
पता.गणेशनगर, भूनेश्वर ता.रोहा
जिल्हा रायगड.
मो. न.९८५०२७००५१.
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space













