चिंचवली ग्रामपंचायत हद्दीत विकास कामांचे उदघाटन
प्रतिनिधि पांडुरंग माने
रायगड (माणगाव) :- ग्रामपंचायतीच्या माध्यमातून चिंचवली भागात विविध विकास कामाचा धूम धडाका सुरु आहे सरपंच नंदू पारावे व सर्व क्रियाशील सदस्य यांच्या माध्यमातून कामे पार पडत आहेत दि.२२ रोजी गोरक्ष नगर (कासार वाडी) येथे सिमेंट कॉ. 
रस्त्यांचे, भूमिपूजन करण्यात आले,तसेच रा. जि. प शाळा चिंचवली पिण्याच्या पाण्याच्या टाकीचे उदघाटन करण्यात आले यावेळी उपस्थित चिंचवली ग्रामपंचायत सरपंच .नंदु पारावे साहेब, उपसरपंच . किशोर तटकरे, सदस्य, चंद्रकांत होळकर, सदस्या, विशाखा हाटकर, सदस्या, . रेश्मा पांचाल, ग्रामविकास अधिकारी घाडगे 
साहेब, कर्मचारी . नरेश कालेकर, . गितेश दायते, ठेकेदार साहिल गायकवाड, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे गोरेगांव विभागीय उपाध्यक्ष, तथा, चिंचवली ग्रामपंचायत सदस्य, .विलास वसंत यादव, व गोरक्ष नगर रहिवासी, आदि उपस्थित होते.
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space













