तालुका खेड प्रतिनिधी खेड तालुका गांव कशेडी ब्रिज ओवरसाठी (हायवे रस्ता नं.६६ ) ग्रामस्थांची मागणी कशेडी , प्रांत अधिकारी खेड यांना निवेदन देण्यात आले आहे

रत्नागिरी (खेड) :- गाव कशेडी येथील ग्रामस्थ पवार वाडी व खोडवाडी हायवे वरील ब्रिज होण्याबाबत मागणी करण्यात आली कारण कशेडी पवार वाडी/ खोंडवाडी येथील ग्रामस्थ, शाळेतील मुले, वाहतुकीची वाहने यांना होणारी वाहतुकीची कोंडी टाळता येईल सदर ओवर ब्रिज बांधकाम झाल्यास रस्ता नं.६६ हावेवरती होणारे अपघात टा
ळू शकता येतील, मृत्यूच्या सापळ्यातून अनेकांना जीवदान मिळेल, तसेच जिवीतहानी होणार नाही म्हणून या हायवे वरती ओवर ब्रिज व्हावा हि आम्हा कशेडी येथील पवार वाडी, खोंडवाडी गावातील सर्व ग्रामस्थांची आपणांस नम्र विनंती आहे तसेच आमच्या मागणीचा आपण विचार न केल्यास आम्ही आंदोलन/ उपोषण करणार आहोत. 
असे निवेदन यावेळी ग्रामस्थांच्या वतीने देण्यात आले त्यावेळी मा .माजी आमदार संजय कदम भाऊ साहेब, इतर मान्यवर व ग्रामस्थ होते. लहू सुर्वे ,नागेश तोडकर, राजु गावणकर ,विजय साळवी ,एकनाथ गावणकर ,गजानन पवार, गणपत खसासे ,मंगेश मादगे ,संतोष शिंदे गणेश जगदोळ ,दिनेश पवार, दिलीप गावणकर गावातील सर्व ग्रामस्थ व उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना यांच्या गटातील सर्व पदाधिकारी व ग्रामस्थ मंडळ उपस्थित होते
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space













