जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा बोरघर घोलपवाडी या शाळेमध्ये नातू नगर केंद्राची केंद्रस्तरीय शिक्षण परिषद नातूनगर केंद्राचे केंद्रीय प्रमुख माननीय उंडे सर यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात संपन्न झाली.

रत्नागिरी (खेड) :- या शिक्षण परिषदेमध्ये शिक्षक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास स्त्रोत या विषयावर श्री. रविकिरण फुंदे सर यांनी सखोल मार्गदर्शन केले. तसेच शाळा पूर्वतयारी अभियान केंद्रस्तरीय प्रशिक्षण श्री. धोंडूराम मिसाळ आणि श्री. संभाजी काकडे सर यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. मध्यंतर नंतर जि प शाळा बोरघर घोलपवाडी शाळेचे मुख्याध्यापक श्री. गणपत दादा जाधव यांचा सेवापूर्ती शुभेच्छा कार्यक्रम खवटी प्रभागाचे शिक्षण विस्तार अधिकारी आदरणीय संतोष भोसले साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. सदर कार्यक्रमासाठी शाळा व्यवस्थापन समितीच्या

अध्यक्षा श्रीम. विद्या शेडगे उपाध्यक्षा सौ. वेदिका गोवळकर व सर्व सदस्य, उपस्थित होते.तसेच शिक्षक पालक संघ व माता पालक संघ पदाधिकारी, बोरघर गावातील सर्व मान्यवर पदाधिकारी, ग्रामस्थ, महिला मंडळ, आजी-माजी विद्यार्थी तसेच नातू नगर केंद्रातील सर्व शिक्षक बंधू-भगिनी, अंगणवाडी सेविका मोठ्या संख्येने या
सोहळ्यासाठी उपस्थित होते. त्याचप्रमाणे पत्रकार बंधू श्री. राजेंद्र दळवी, खवटी हेउपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गावातील प्रतिष्ठित मान्यवर श्री. जयराम चव्हाण,श्री. अनिल पार्टे सर , श्री राजेश केळसकर, श्री. समीर म्हाब्दी, श्री. पंकज जंगम, श्री महेंद्र शेडगे, श्री राजेंद्र मोरे आणि सर्व ग्रामस्थ व महिला व शाळेतील पदवीधर शिक्षक श्री नरेश ठोंबरे, श्री ज्ञानदेव लेंभे, उपशिक्षक श्री. संभाजी काकडे, श्री भरत बोडके यांनी विशेष मेहनत घेतली. या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेचे पदवीधर शिक्षक श्री नरेश गुणाजी ठोंबरे यांनी केले.
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space













