तेरातास, जिद्दीने धरला वयाचा पहिला रोजा

जालना (भोकरदन) :- जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यात मुस्लिम धर्मातील रमजान महिना सर्वात श्रेष्ठ आणि इबादत करणारा महिना मानला जात असून मुस्लिम समाजाचे एका महिन्याचे उपवास सुरू असताना दरवर्षीप्रमाणे सर्वच अल्लासाठी एका महिन्याची इबादत आणि रोजे (उपवास) ठेवतात. तर त्यांचा उद्देश हाच असतो की अल्लाहाकडे आम्ही प्रार्थना केल्यावर आमची प्रार्थना मागणी पूर्ण होईल व गेल्या वर्षांमध्ये नमाज व चांगले कार्य केले गेले जसे रोजा, नमाज तीलावत हज, सदका ,जकात, हे मुस्लिमांचे समाज या महिन्यांमध्ये गरिबांना पैसे कपडे व इतर वस्तू वाटप करत असतात. सर्व मुस्लिम रोजा आणि सर्व चांगले कार्य या महिन्यात करत असतात पण अशाच ठिकाणी छोटी मुले देखील आपल्या आई-
वडीलां प्रमाणे मोठ्या जिद्दीने व उत्साहाने आम्हाला पण रोजा ठेवायचे आहे. अल्लाहाकडे प्रार्थना करायची आहे असे करण्याचा प्रयत्न करतात भोकरदन तालुक्यातील कुंभारी येथील मारुफबेग सद्दाम बेग मिर्झा यांने वयाच्या सातव्या वर्षी या चिमुकल्याने स्वतः च्या जीवाची परवा न करता कडकडीत उन्हाळ्यात सकाळी उठून ०४.५७ वाजेच्या सुमारास सहैरी बरकत खाऊन दिवसभर काही न खाता पिता आपला रोजा ०६. ४९ सायंकाळी मिनिटांनी पूर्ण केला असून यामुळे गावकरी व इतर सर्व समाज आश्चर्यचकित झाले असून, या अलौकिक गोष्टीमुळे नातेवाईकांकडून व परिवाराकडून त्याचे कौतुक होत आहे.
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space













