जय श्री राम क्रिकेट क्लब आयोजित क्रिकेट स्पर्धा संपन्न
प्रतिनीधी पांडुरंग माने
रायगड (माणगाव) :- भाजप उत्तर सेल ता अध्यक्ष आनंद राजभर यांच्या मार्गदर्शनाखाली चिंचवली जय श्री राम क्रिकेट क्लबने ओव्हर आर्म क्रिकेटचे सामने दि 1,2,3 एप्रिल रोजी चिंचवली येथे भव्ये 
अशा मैदानात आयोजित केले होते तीन दिवस चाललेल्या मेचेस पाहण्यासाठी विविध राजकीय मंडळी तसेच क्रिकेट प्रेमी यांनी उपस्थिती दर्शवली होती अंतिम सामना फलक इलेव्हणं गोरेगाव विरोध नवघर ह्या दोन बलाढ्य संघात झाला त्या सामन्यात फलक इलेव्हन गोरेगाव संघांनी नवघर संघावर मात करून पहिला क्र 
आपल्या नावावर केला व दुसऱ्या क्र वर नवघर संघानीं नाव कोरलं, तिसरा क्र कौस्तुभ इलेव्हन वाघोसे आणि चौथा क्र लोणरे संघांनी मिळवला यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून एन, आर, ग्रुप चे सर्वेसर्वा उद्योपती नरेशजी अहिरे, पथिक प्रतिष्ठान संस्थापक अध्यक्ष उद्योपती प्रकाशजी हरवंडकर, जय श्री राम संघ व्यवस्थापक आनंद राजभर,भाजप ता सरचिटणीस गोविंद कासार, भाजप ता महिला उप अध्यक्ष यशोधरा गोडबोले, सुतार समाज जिल्हा अध्यक्ष रामचंद्र मेस्त्री, भीम सेना प्रमुख गोपी मोरे,गाव अध्यक्ष विठ्ठल गवसकर, भाजप जिल्हा उप अध्यक्ष नाना महाले,भाजप विभागीय अध्यक्ष युवराज मुंडे, वंचित बहुजन आघाडी ता अध्यक्ष रोहन साळवी, उद्योगपती अक्षय जाधव, चिंचवली मा सरपंच अशोक दायते, मा उप सरपंच अश्विनी कडू,प्रियंका मेहता, रोशनी जाधव, निलेश राशींनकर, लक्षण पारावे, रितेश निवाते, माजी पोलीस पाटील सिताराम गवसकर, महादेव गवसकर, अनिल गवसकर तसेच सामने पार पडण्या साठी सोमजाई चिंचवली संघाच्या आकाश पांचाळ, राजा गवसकर, सूरज भौड, सुनील गवसकर, तसेच संघांचे सर्व खेळाडू उपस्थित होते
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space













