नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , युवा कब्बड्डी सिरीज पुणे या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या रत्नागिरी जिल्ह्याच्या संघास शूज, किट बॅग व टी-शर्ट वाटप करण्यात आले … – आजचा महाराष्ट्र

युवा कब्बड्डी सिरीज पुणे या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या रत्नागिरी जिल्ह्याच्या संघास शूज, किट बॅग व टी-शर्ट वाटप करण्यात आले …

पत्रकार राजेंद्र दळवी

रत्नागिरी (खेड) :- महाराष्ट्र राज्य कब्बड्डी असोसिएशनच्या मान्यतेने क्रांतीज्योती महिला प्रतिष्ठान कब्बड्डी सिरीज राजाराम भिकू पठारे स्टेडियम खराडीगाव पुणे येथे दिनांक २९ मार्च ते ०१ मे २०२३ या कालावधीत युवा पुरुष गटाची कब्बड्डी स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेसाठी रत्नागिरी जिल्हा संघासाठी २० खेळाडूंची निवड करण्यात आली. सदर खेळाडूंचे सराव शिबिर काळकाई मंदिर-भरणे, ता.खेड येथे दि.२४ मार्च ते ०३ एप्रिल २०२३ पर्यंत खेड तालुका कब्बड्डी असोसिएशनच्या सौजन्याने सुरू आहे.

       शिबिरातील सरावानंतर या स्पर्धेत जाणाऱ्या संघाला मॅटवरील या स्पर्धेत खेळण्यासाठी मंडणगड तालुका कब्बड्डी असोसिएशनच्या सौजन्याने या शिबिराचे प्रशिक्षक श्री. शरद महाडिक व मंडणगड असोसिएशनचे सचिव, राष्ट्रीय पंच श्री.सचिन सकपाळ सर यांच्या प्रयत्नाने मंडणगड तालुक्यातील अडखळ गावची सुपुत्र व सध्या मुंबई येथे वास्तव्यास असणारे प्रसिद्ध उद्योजक सामाजिक, कला, क्रीडा, शैक्षणिक क्षेत्रात योगदान देणारे श्री. विक्रांतराव उर्फ मुन्ना प्रकाशराव महाडिक यांनी सर्व खेळाडूंसाठी चांगल्या दर्जाचे कब्बड्डी शूज देऊन या स्पर्धेत खेळण्यासाठी प्रोत्साहित केले. तसेच श्री. संतोष पांडुरंग दळवी बँक शाखाधिकारी यांनी खेळाडूंसाठी स्पर्धेदरम्यान आवश्यक साहित्याच्या हाताळणीसाठी कीट बॅग दिल्या. तर कबड्डीसाठी नेहमी योगदान देणारे चिपळूण तालुक्यातील कुंभार्ली गावचे सुपुत्र,कब्बड्डीप्रेमी जिल्ह्याच्या चाचणी स्पर्धांचे आयोजनात पुढाकार घेणारे क्रीडाप्रेमी श्री.संतोष शिंदे यांनी या शिबिरातील सहभागी सर्व खेळाडूंना आकर्षक टी-शर्ट देण्यासाठी योगदान दिले. स्पर्धेसाठी शूज, किट बॅग व टी-शर्ट वाटपाचा कार्यक्रम नुकताच शिबिर ठिकाणी काळकाई मंदिर भरणे येथे संपन्न झाला . रत्नागिरी जिल्ह्याच्या या संघासाठी स्पोर्टस् साहित्याच्या रूपाने या स्पर्धेसाठी महत्त्वपूर्ण योगदान देणारे सर्व साहित्य दाते यांना महाराष्ट्र राज्य कब्बड्डी असोसिएशनचे सहसचिव श्री.रविंद्र देसाई सर, रत्नागिरी जिल्हा कब्बड्डी असोसिएशनचे अध्यक्ष श्री.सचिनभाई कदम खेड तालुका कब्बड्डी असोसिएशन अध्यक्ष श्री. सतीश उर्फ पप्पुशेठ चिकणे यांनी विशेष धन्यवाद दिले. व सर्व खेळाडूंना या निमित्त शुभेच्छा दिल्या.

      याप्रसंगी उद्योजक श्री.मुन्ना महाडिक यांचे समवेत एअर इंडिया सेवानिवृत्त अधिकारी श्री. प्रकाशदादा शंकरराव पालांडे, वस्त्रोद्योगातील नामांकित रेमंड कंपनीतील निवृत्त अधिकारी श्री.दिलीप बांबर्डेकर, मुंबई वरळी येथील इंजिनियर श्री.अमोल शिनकर, श्री.संदीप पाटोळे, ठाणे येथील डॉक्टर श्री.श्रीकांत नाईक, प्रो कब्बड्डी पहिल्या सीजनचे पंच, मुंबई उपनगर कब्बड्डी असोसिएशनचे माजी कार्यकारणी सदस्य, राष्ट्रीय पंच, सध्या मु.पालवणी तालुका- मंडणगड या गावचे सरपंच श्री.सचिन गुजर, श्री देवी काळकाई देवस्थानचे सचिव, कब्बड्डीसाठी नेहमी योगदान देणारे कब्बड्डीपटू श्री. सुजित शिंदे, शिबिराचे प्रशिक्षक श्री.शरद महाडिक, मंडणगडचे राष्ट्रीय पंच श्री. सचिन सकपाळ, खेड तालुका कब्बड्डी असोसिएशनचे सचिव श्री. रविंद्र बैकर, कोषाध्यक्ष श्री. दाजी राजगुरू, सहसचिव श्री.शरद भोसले, कार्यकारणी सदस्य, राष्ट्रीय पंच श्री.सुभाष आंबेडे, अनिकेत स्पोर्टस् क्लब भरणे महिला संघाचे प्रशिक्षक, जेष्ठ पंच श्री.सुजित फागे, शिबिर स्थळी सर्व खेळाडूंची भोजन व्यवस्था करणारे प्रमुख श्री. संतोष जाधव हे मान्यवर उपस्थित होते.

   प्रमुख मान्यवर म्हणून उपस्थित असणारे श्री. विक्रांत उर्फ मुन्ना महाडिक यांनी प्रतिकूल परिस्थितीवर कष्ट,जिद्द, आणि मेहनत याद्वारे मात करून यशस्वी होता हे स्वतःच्या जीवन अनुभवातून सांगितले. तसेच जीवनात यशस्वी होण्यासाठी चांगले मार्गदर्शक आणि चांगली संगत याचे महत्त्व देखील अधोरेखित केले. यापुढे रत्नागिरी जिल्ह्यातील कब्बड्डी खेळासाठी प्रोत्साहन म्हणून ज्या ठिकाणी आवश्यकता असेल त्यावेळी मला कल्पना द्या मी निश्चितच आपल्यासाठी माझ्यापरीने योग्य त्या सहकार्यासाठी सज्ज असेन अशी ग्वाही देखील दिली. उपस्थित सर्व मान्यवरांनी स्पर्धेसाठी जाणाऱ्या सर्व खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सहसचिव श्री. शरद भोसले यांनी केले.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]