नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , आदर्शगाव भातसई येथिल श्री महादेवी मातेच्या यात्रेचा ४ तारखेला पालखी व ५ तारखेला मोठा उत्सव साजरा करण्यात येणार आ – आजचा महाराष्ट्र

आदर्शगाव भातसई येथिल श्री महादेवी मातेच्या यात्रेचा ४ तारखेला पालखी व ५ तारखेला मोठा उत्सव साजरा करण्यात येणार आ

पत्रकार समीर बामुगडे

रायगड (रोहा) :- खुप वर्षांपुर्वी भातसई गावातील गुराखी गाई चारण्यासाठी एका तळ्याकाठी मिठकेशवर जाळी जवळ गेला असता महादेवी मातेने त्याला दर्शन दिले त्याला सांगीतले मी

गावाच्या पुर्व दिशेला माळावर प्रग्रट झाली आहे. सदर ठिकाण महादेवी मातेंच स्वयंभू स्थान आहे.जुनी लोक अशी सांगतात की सरकारी अधिकारी यात्रा उत्सव बंद करण्यासाठी आले असता दैवीचा साक्षात्कार झाला त्यामुळे यात्रा उत्सवाला सरकारी परवानगी दिली गेली आहे. यात्रा उत्सव चैत्र पौर्णिमेला दरवर्षी होत आहे. ज्या दिवशी दोन पौर्णिमा येतात त्या दिवशी उत्सव साजरा केला जातो. तसेच नवरात्र उत्सव साजरा केला जातो त्यासाठी नवस फेडण्यासाठी खुप भाविक येत असतात. सध्या देवीचे भगत

चिंतामणी सखाराम खरीवले हे आहेत . देवीचा वारा खरीवले कुटुंबातील सदस्यांच्या अंगात येतं असतो.हि यात्रा उत्सव दोन दिवस असते.यात्रेला मिठाई, खेळणी,नवसाच्या काट्या वाजतगाजत मिरवणूकही काढतात यात्रेच वैशिष्ट्य म्हणजे पाठीला गळ टोचून घेतले जातात

हाकेला धावणारी नवसाला पावणारी आदर्शगाव भातसई येथिल श्री महादेवी मातेची पालखी व यात्रा उत्सव मंगळवार दिनांक ०४/०४/२०२३ रोजी दुपरी १२ वाजता पालखी मिरवणुकीला भातसई गावातुन वेशीच्या मंदिरातुन सुरुवात होणार आहे. पालखी नतंर झोलांबे कोपरे या गावात जाते.त्यानंतर पालखी झोलांबे गाव ,लक्ष्मीनगर येथे फिरवून रात्री ०७ वाजता आदर्शगाव भातसई गावात घरोघरी भक्तीमय वातावर्नात फिरून महादेवी मंदिरात जाते.

दुस-या दिवशी बुधवार ०५/०४/२०२३ रोजी महादेवी मातेचा यात्राउत्सवाला सुरुवात होते.सकाळ पासुनभक्त नवस घेऊन मंदिरात वाजत गाजत येत आसतात. सर्व रायगड जिल्ह्यातील व बाहेरून जिल्यातील भक्ताचे जनसागर महादेवी आईच्या यात्रेमध्ये सहभागी होतात. यात्रेचा मुख्य कार्यक्रम गळ लावणे. यावर्षीचा गळ सायंकाळी ०५-३० वाजता सुरुवात होणार आहे. एकूण सहा भक्ताना गळ लावले जातात. त्यांपैकी एक भक्तांचा वरचा गळ लाटेला लटकवून एक फेरी फिरवली जाते.या उत्सवासाठी निडी,कोपरे,झोळांबे लक्ष्मीनगर,वरवडे पाले तर्फे अष्टमी, आरे बुंद्रुक, शेजारी गांवातील मानाच्या काट्या येतात.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]