भोकरदन शहरात काँग्रेस च्या वतीने भाजपा सरकारच्या विरोधात तीव्र निषेध आंदोलन…

जालना (भोकरदन) :- भोकरदन शहरात काँग्रेसचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी यांचे खासदारकीचे सदस्य पद रद्द करण्याच्या विरोधात 
जालना जिल्हा काँग्रेस कमिटी व भोकरदन तालुका काँग्रेस कमिटी यांच्या संयुक्त विद्यमाने सायंकाळी दि. २४ मार्च शुक्रवार रोजी भोकरदन शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात भाजपा सरकार विरोधात जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख यांच्या नेतृत्वाखाली तीव्र निषेध व्यक्त करून आंदोलन करण्यात आले.

यावेळी युवक कॉंग्रेस चे जिल्हा अध्यक्ष राहुल भैय्या देशमुख, भोकरदन तालुका अध्यक्ष त्र्यंबकराव पाबळे,राष्ट्रवादी कॉंग्रेस युवक अध्यक्ष प्रा.अंकुश जाधव,शिवसेनेचे सुरेश तळेकर,महेश पुरोहित,ईरफान सिद्दीकी,संतोष अन्नदाते,सोपान सपकाळ यांच्यासह महाविकास आघाडी चे पदाधिकारी व कार्यकर्ते यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
प्रतिक्रिया,
१)राजाभाऊ देशमुख, जिल्हा अध्यक्ष जालना
2 ) सरेश तळेकर शिवसेना नेते भोकरदन
3 )राहुल देशमुख ,युवक कॉंग्रेस जिल्हा अध्यक्ष,जालना
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space













