महाड तालुक्यात खुलेआम होतेय वृक्षतोड ? नागाव परिरात वृक्षतोड सुरु

वनखात्याचे दुर्लक्ष ;पर्यावरणाची हानी ;ठोस कारवाईची पर्यावरणप्रेमींची मागणी
रायगड (महाड) :- एकीकडे राज्य शासन संपूर्ण राज्यात १००कोटी झाडे लावण्याचा बेधडक कार्यक्रम राबवित आहे ,तर दुसरीकडे संरक्षित प्रादेशिक वने व वारेमाप वृक्षतोड थांबविण्यात अपयशी ठरलेले वन व महसूल खाते खाजगी वृक्षतोड अधिनियमांतर्गत वृक्षतोडीला मोठया प्रमाणात चालना देत आहे,

या अधिनियमाचा गैरवापर करून दरवर्षी राज्यातील दीड ते दोन कोटी झाडांची कत्तल केली जात आहे. लाकडाचा धंदा करणारे अवैध ठेकेदार, लाकूड तस्कर,वनखात्याच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना मालामाल करून खुलेआमपणे नागाव परिसरात वृक्षतोड केली जात आहे. त्यामुळे या वृक्षतोडीचा पर्यावरणावर विपरित परिणाम होत असल्याने या अवैध वृक्षतोडींवर कडक कारवाई करण्याची मागणी पर्यावरणप्रेमीं कडून जोर धरीत आहे

एकीकडे १०० कोटी वृक्षलागवडीच्या वल्गना सुरू असताना दुसरीकडे राज्यात वन व महसूल खात्याच्या सौजन्याने खासगी वृक्षतोड अधिनियमांतर्गत प्रत्येक जिल्ह्य़ात अनुसूचित व बिगर अनुसूचित अशा ५ लाख वृक्षाची खुलेआम तोड करण्यात येते ,वन खात्याचे उपवनसंरक्षक सहाय्यक, वनसंरक्षक, वनपरिक्षेत्राधिकारी, महसूल खात्याच्या उपविभागीय अधिकाऱ्यांकडून या तोडीचे व वाहतुकीचे परवाने देण्यात येतात खासगी वृक्षतोड अधिनियम हा विशेषत:शेतकरी व कातक-यांच्या हितासाठी निर्माण करण्यात आला स्वत:च्या शेतातून कृषी अवजारे ,इमारती लाकूड व जळतन फाटा मिळण्यासाठी हा सुटसुटीत व सुबक कायदा करण्यात आला,
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space













