नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , श्री स्वामी समर्थ सेवा मार्गाचे प्रमुख श्री गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांच्या ६८ व्या अभीष्टचिंतनानिमीत्त विविध धार्मिक उपक्रमांचे आयोजन – आजचा महाराष्ट्र

श्री स्वामी समर्थ सेवा मार्गाचे प्रमुख श्री गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांच्या ६८ व्या अभीष्टचिंतनानिमीत्त विविध धार्मिक उपक्रमांचे आयोजन

प्रतिनीधी संजय कदम

रायगड (पनवेल) :- दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ सेवा मार्गाचे प्रमुख श्री गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांच्या ६८ व्या अभीष्टचिंतनानिमीत्त दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ नवीन पनवेल केंद्रातर्फे प.पु. गुरुमाऊलींना दीर्घायुष्य तसेच सुआरोग्य लाभावे या साठी पनवेल शहरातील विविध मंदिरांमध्ये सेवा घेवून प्रार्थना करण्यात आली.

पनवेल मधील पुरातन विरुपाक्ष मंदिर, खांदेश्वर मंदीर, हनुमान मंदिर- पोदी, शितला माता मंदिर, ईच्छापूर्ती गणेश मंदिर, बालाजी मंदिर या ठिकाणी विविध सेवांचे नियोजन करण्यात आले होते. पापमोचनी एकादशीच्या दिवशी प.पु. गुरुमाऊलींच्या अभीष्टचिंतनच्या दिवशी श्री बालाजी मंदिर येथे विशेष लक्ष्मी नारायण याग आणि महामृत्युंजय यागाचे नियोजन केले होते त्यामधे शेकडो सेवेकरी सहभागी झाले होते.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]