नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , रोहा तालुक्यातील मालसई गावात सापडले ऐतिहासिक अवशेष – आजचा महाराष्ट्र

रोहा तालुक्यातील मालसई गावात सापडले ऐतिहासिक अवशेष

पत्रकार समीर बामुगडे

रायगड (रोहा) :- रायगड जिल्ह्यातील, रोहा तालुक्यात प्रामुख्याने चार गडांचा सामावेश आहे ,यातील अवचितगड हा ऎतिहासिक श्रीमंतीने नटलेला गड म्हणून ओळखला जातो.शिवकाळा पूर्वी समुद्रामार्गे कुंडलीका नदितून चालणार्‍या व्यापाराचे प्रमुख केंद्र म्हणून अवचितगडाची ओळख आहे.. येथून घाटवाटांमार्गे व्यापार चालत असे यातील रेवदंडा येथील चौल हे आंतराष्ट्रीय व्यापारी बंदर होते..याच अवचितगड राहाळ परिसरात अनेक ऎतिहासिक दस्तावैज आणि ऎतिहासिक अवशेष आजही पहावायस मिळतात..

अवचितगडाच्या कुशीत वसलेले आणि छञपतींचे परम मीञ तथा सुभेदार तानाजी मालुसरेंचा वारसा सांगणारे मालसई गाव आजही इतिहासाच्या पाऊलखुणा जपून तालुक्यात प्रसिद्ध आहे.. पूर्वेला डोंगराच्या सोंडेवर बसलेले आणि निसर्गाच्या छञछायेत वसलेल्या मालसई गावातील ऎतिहासिक ठेवा ग्रामस्थ योगेश मालुसरे आणि हेमंत मालुसरे यांच्या जिज्ञासू वृत्तीमुळे नुकताच उजेडात आला.. आणि गावाचा संबंध पुरातन असण्यावर शिक्कामोर्तब झाले.

मालुसर्यांची प्रामुख्याने वस्ती असलेल्या मालसई गावात, गावातील महादेव मंदिराच्या परिसरात काही विरगळ आढळून आल्या सोबतीलाच सतीशीळा तसेच भंगलेली शिवपिंड आणि नंदि असे पुरातन महिमा सांगणारे अवशेष आढळून आले आहेत.. वर्षानुवर्षे खितपत पडलेली पिंड आणि नंदि मातीमोल होता होता संवर्धीत झाले आहेत..

महादेव मंदिराच्या परिसरात सापडलेले वीरगळ आणि सतीशीला तसेच अनामिक वीरांच्या समाध्या पहाता गावात तानाजी मालुसरेंचा वारसा जपणारे अनेक वीर स्वराज्य कार्यात धारातीर्थ पडल्याची खाञी होते… कदाचित अवचितगडाच्या संरक्षणासाठी गावातील लढव्वया वीरांनी प्राणांची आहुती दिल्याचीही शक्यता नाकारता येत नाही..तर वीरगतीला गेलेल्या वीरांच्या पाठोपाठ त्यांच्या स्ञीयाही सती गेल्या मुळे त्या स्ञीयांच्या स्मरणार्थ सतीशीळा उभारण्यात आली आहेत.जमीतीला एवढा समृद्ध वारसा असणारे मालसई हे एकमेव गाव रोहा तालुक्यात आढळून आले आहे… गावातील तरुणांची आणि ग्रामस्थांची नैतिक जबाबदारी बनते की ऎतिहासिक वारसा सांगणार्या या अवशेषांचे व्यवस्थित संवर्धन करुन येणार्या पिढीला आपल्या पूर्वजांचा पराक्रमी वारसा दाहिदीशांना पसरवण्याची..

अनेक गावांना फक्त भुगोल असतो तर काही गावांना इतिहास असतो पण आपल्या मालसई गावाला तानाजींच्या मालुसरेंच्या लौकीकाचे वलय आहे याची जाणीव ग्रामस्थांनी ठेऊन भौगोळीक सामुग्रीच्या साक्षीने आपल्या गावाचा इतिहास समृद्ध करण्याची जबाबदारी गावातील प्रत्येकावर पडते.. याची जाणीव ठेऊन मिळालेला ऎतिहासिक ठेवा व्यवस्थित जपला जाईल, पुजला जाईल आणि संशोधन करुन अजून त्यात भर घातली जाईल अशी आशा बाळगण्यास हरकत नसावी…

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]