स्पीड ब्रेकरवर पांढरे व पिवळे पट्टे मारण्याची मागणी ?

रायगड (रोहा) :- रोहा शहरातून, भुवनेश्वर कडून रोहा शहरालगत जाण्या-या भुवनेश्वर ते लाढर रोड रस्त्याची कामे वेगाने झाली परंतू ठिकठिकाणी रोहा शहर व आजूबाजूच्या रोडवर झालेल्या स्पीड ब्रेकरवर सफेद व पिवळे पट्टे मारण्यात आल्याचे दिसून येत नाही. त्यामुळे या ठिकाणी सफेद व पिवळे पट्टे मारण्यात यावेत अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे,
रोहा तालुक्यातील कोलाड रोड ,नागोठणे रोड ,रेवदंडा रोड ,भुवनेश्वर गाव ,वरसे आदी रस्त्यावर स्पीड ब्रेकर टाकण्यात आले आहेत या स्पीड ब्रेकरवर पट्टे नसल्याने वाहने मोठ्या प्रमाणात धडकली जात आहेत या ठिकाणी भीषण अपघात होऊन हानी होण्याची शक्यता आहे त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने स्पीड ब्रेकरवर पट्टे मारावेत अशी मागणी नागरिकाच्या वतीने केली जात आहे
तर भुवनेश्वर कालवा रोडवर झोपडपट्टी व बिल्डर लॉबींची अनधिकृत कामे फोफावली आहेत. साकव पुलाचा गैरवापर काही नागरिकांकडून केल्याचे दिसून येत असताना सबंधित पाटबंधारे विभागाचे अधिकारी सदर बाबींकडे डोळे झाक करत असल्याचे नागरिकांकडून बोलले जात आहे ,संबंधित विभागाकडे प्रवाशी वर्गाने थेट बोट करून आरोप केला आहे ,
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space













